मेलबर्न, : भारताचा वेगवान गोलंदाज उमेश यादवला गंभीर दुखापत झाली आहे आणि तो या कसोटी मालिकेत खेळू शकणार नाही. उमेशची जागा घेण्यासाठी भारतीय संघाकडे टी. नटराजन, नवदीप सैनी आणि शार्दुल ठाकूर असे तीन पर्याय उपलब्ध आहेत. पण उमेशच्या जागी शार्दुलला संघात कशी संधी मिळू शकते, पाहा... बीसीसीआयमधील एका सूत्रांनी सांगितले की, " टी. नटराजन हा ऑस्ट्रेलियातील ट्वेन्टी-२० मालिकेत खेळला होता आणि त्याने नेत्रदीपक कामगिरी केली होती. पण नटराजनने फक्त एकच प्रथम श्रेणी सामना खेळला आहे. पण दुसरीकडे शार्दुल हा सातत्याने प्रथम श्रेणी सामने खेळत आला आहे. त्याचबरोबर शार्दुलला वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी सामन्यात संधी देण्यात आली होती. पण या सामन्यात एकही षटक न टाकता शार्दुल दुखापतग्रस्त झाला होता आणि त्याला मैदान सोडावे लागले होते. त्यामुळे या दोघांचा आतापर्यंतचा अनुभव पाहता नटराजनऐवजी भारतीय संघात शार्दुलला संधी मिळण्याची दाट शक्यता आहे." उमेश यादवऐवजी कोणत्या वेगवान गोलंदाजाला खेळवायचे, हा निर्णय कर्णधार अजिंक्य रहाणे, मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री आणि गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण हे सिडनीला पोहोचल्यावर घेतील. आतापर्यंत शार्दुलने ६२ प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत, त्याचबरोबर त्याच्या नावावर २०६ विकेट्सही आहेत. शार्दुलच्या नावावर सहा अर्धशतकेही आहेत. त्यामुळे जर शार्दुलला संघात स्थान दिले तर तो वेगवान गोलंदाजीबरोबरच उपयुक्त फलंदाजीही करू शकतो. त्यामुळे शार्दुल हा एक चांगला पर्याय भारतीय संघापुढे असेल. भारताचा वेगवान गोलंदाज उमेश यादव हा दुसऱ्या सामन्यात दुखापतग्रस्त झाला आहे. त्यामुळे तो तिसऱ्या सामन्यात खेळणार की नाही, याबाबत साशंकता आहे. त्याचबरोबर मोहम्मद शमीही दुखापतीमुळे या दौऱ्यात खेळू शकणार नाही. त्यामुळे तिसऱ्या सामन्यात जर उमेश खेळू शकणार नसेल, तर त्याच्या जागी मराठमोळा शार्दुल ठाकूर, टी. नटराजन आणि नवदीप सैनी या तीनपैकी एका युवा वेगवान गोलंदाजाला संधी मिळू शकते. त्यामुळे तिसऱ्या सामन्यात नेमके कोणते बदल होतात, याची उत्सुकता सर्वांनाच असेल.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3o3hlbe
No comments:
Post a Comment