Ads

Tuesday, December 29, 2020

लाजिरवाण्या पराभवाचे उत्तर अभिमानास्पद विजयाने; भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध केले हे विक्रम

मेलबर्न: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने ८ विकेटनी विजय मिळवत चार सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी केली. एडिलेड येथे झालेल्या पहिल्या कसोटीत भारतीय संघाचा दुसऱ्या डावात ३६ धावांवर ऑल आउट झाला होता. त्यानंतर भारताने तो सामना ८ विकेटनी गमावला. त्यानंतर दुसऱ्या कसोटी सामन्यात चार बदलासह भारतीय संघ मैदानात उतरला. प्रथम गोलंदाजांनी केलेली उत्तम कामगिरी त्यावर फलंदाजांनी मिळून दिलेली आघाडी आणि पुन्हा गोलंदाजांनी केलेल्या सर्वोत्तम कामगिरीच्या जोरावर भारताने बॉक्सिंग डे कसोटीत आठ विकेटनी विजय साकारला. वाचा- अजिंक्य भारताचे विक्रम... >> बॉक्सिंग डे कसोटीत विजय मिळवण्याची भारताची ही दुसरी वेळ आहे. भारताने २०१८ साली सर्व प्रथम विजय मिळवला होता. त्यानंतर आज भारताने विजय मिळवला. भारताने सलग दुसऱ्यांचा बॉक्सिंग डे सामन्यात विजय मिळवला आहे. >> भारताचा कर्णधार अजिंक्य रहाणेने संघाचे नेतृत्व करण्याची ही तिसरी वेळ आहे. या तिनही सामन्यात त्याने विजय मिळवला आहे. याआधी रहाणेने २०१६ साली धर्मशाला कसोटीत ऑस्ट्रेलियावर ८ विकेटनी, २०१८ साली अफगाणिस्तानला एक डाव २६२ धावांनी आणि आज ऑस्ट्रेलियाचा ८ विकेटनी पराभव केला. >> महेंद्र सिंह धोनीनंतर हा भारताचा दुसरा कर्णधार आहे ज्याने संघाचे नेतृत्व करताना पहिल्या तिनही सामन्यात विजय मिळवला. >> भारतीय संघाने परदेशातील एखाद्या मैदानावर सर्वात जास्त विजय मेलबर्न मैदानावर मिळवले आहेत. भारताने या मैदानावर १४ पैकी ४ लढतीत विजय मिळवले आहेत. तर पोर्ट ऑफ स्पेन मैदानावर ३ विजय मिळवले आहेत. वाचा- >> ऑगस्ट २०१० नंतर भारताने प्रथम गोलंदाजी करत विजय मिळवण्याची ही पहिली वेळ आहे. तेव्हा भारताने श्रीलंकेचा पराभव केला होता. >> घरच्या मैदानावर नाणेफेक जिंकून कसोटी सामना गमवण्याची ऑस्ट्रेलियाची २०११ नंतरची ही पहिलीच वेळ आहे. >> या सामन्यात भारताचा फिरकीपटू आर अश्विनने जोश हेजलवुडची विकेट घेत १९२व्या डावखुऱ्या फलंदाजाला बाद केले. याबाबत त्याने मुरलीधरनला मागे टाकले. >> अजिंक्य रहाणेने कसोटीत जेव्हा जेव्हा शतक केले तेव्हा भारताचा कधीच पराभव झाला नाही. हा योगायोग या सामन्यात देखील कायम राहिला. >> मेलबर्न मैदानावर बॉक्सिंग डे कसोटीत शतक करणारा अजिंक्य रहाणे हा सचिन तेंडुलकरनंतरचा भारताचा दुसरा कर्णधार ठरलाय. वाचा- >> परदेशातील भारतीय संघाचा हा ५२वा कसोटी विजय ठरला आहे. >> गेल्या ५० वर्षात ऑस्ट्रेलियाविरुद्ध घरच्या मैदानावर मालिकेत १-० अशी पिछाडीवर असताना दुसऱ्या सामन्यात विजय मिळून मालिकेत १-१ अशी बरोबरी करणारा भारत हा फक्त तिसरा संघ आहे. अशी कामगिरी वेस्ट इंडिजने १९७५ साली तर न्यूझीलंडने २०११ साली केली होती. >> या शतकात भारताने ऑस्ट्रेलियात २२ पैकी ५ विजय मिळवले आहेत. तर ऑस्ट्रेलियाने भारतात २२ पैकी ४ विजय मिळवलेत. >> कसोटी मालिकेत ५० पेक्षा कमी धावसंख्येत ऑल आउट झाल्यानंतर दुसऱ्याच सामन्यात विजय मिळवणारा भारत हा कसोटी इतिहासातील फक्त तिसरा संघ ठरला आहे. याआधी इंग्लंडने दोन वेळा तर आणि दक्षिण आफ्रिकेने एकदा अशी कामगिरी केली आहे. >> मालिकेतील पहिला सामना गमवल्यानंतर मालिका जिंकण्याची कामगिरी भारताने चार वेळा केली आहे. हे सर्व विजय परदेशातील भूमीवर केले आहेत. वाचा- >> ऑस्ट्रेलियातील पदार्पणाच्या सामन्यात सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजात मोहम्मद सिराज दुसऱ्या स्थानावर आहे. त्याने ५ विकेट घेतल्या. या यादीत लसित मलिंगा ६ विकेटसह पहिल्या स्थानावर आहे. >> ३२ वर्षानंतर घरच्या मैदानातील कसोटीत एकाही ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजाने अर्धशतक न करण्याची ही पहिलीच वेळ आहे. याआधी मेलबर्न मैदानावर वेस्ट इंडिजविरुद्ध असे झाले होते. >> Mullagh Medal मिळवणारा अजिंक्य रहाणे हा पहिला क्रिकेटपटू ठरला आहे. >> भारताकडून कसोटीत विजयी धाव काढण्याची अजिंक्य रहाणेची ही पहिली वेळ आहे. त्याने ६७ कसोटी सामने खेळले आहेत. >> २९ डिसेंबर रोजी बॉक्सिंग डे कसोटीत विजय मिळवण्याची ही भारताची दुसरी वेळ आहे. याआधी २०१० साली दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यात भारताने डर्बन कसोटीत चौथ्या दिवशी २९ डिसेंबर रोजी ८७ धावांनी विजय मिळवला होता.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/34Sfs9T

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...