मेलबर्न: गोलंदाजांनी केलेल्या शानदार गोलंदाजीच्या जोरावर बॉक्सिंग डे कसोटीत भारतीय संघ विजयाच्या उंबरठ्यावर उभा आहे. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा यजमान ऑस्ट्रेलियाने ६ बाद १३६ धावा केल्या होत्या आणि फक्त २ धावांची आघाडी घेतली होती. त्याआधी भारताने पहिल्या डावात ३२६ धावाकरत १३१ धावांची आघाडी घेतली होती. सामन्यातील दोन दिवस अजून शिल्लक आहे. आता उद्या ऑस्ट्रेलियाच्या तळातील फलंदाजी किती लढात देतात त्यावर भारताच्या विजय लांबेल. वाचा- कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारताचा पहिला डाव ३२६ धावांवर संपुष्ठात आला. भारताने पहिल्या डावात १३१ धावांची महत्त्वाची आघाडी घेतली. भारताकडून कर्णधार रहाणेने ११२ तर रविंद्र जडेजाने ५७ धावा केल्या. वाचा- ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावाची सुरूवात पुन्हा एकदा खराब झाली. जे बर्न्सला उमेश यादवने ४ धावांवर बाद करत ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का दिला. त्यानंतर आर अश्विनने पुन्हा एकदा मोठी विकेट मिळून दिली. त्याने मार्नस लाबुशानेला २८ धावांवर बाद करत यजमानांची अवस्था २ बाद ४२ केली. लाबुशानेच्या जागी आलेल्या स्टीव्ह स्मिथला जसप्रीत बुमराहने ८ धावांवर बोल्ड केले. दरम्यान भारताचा जलद गोलंदाज उमेश यादवला दुखापत झाल्याने तो मैदानाबाहेर गेला. वाचा- स्मिथ बाद झाल्यानंतर कर्णधार रहाणेने रविंद्र जडेजाच्या हातात चेंडू दिला. त्याने देखील कर्णधाराला निराश केले नाही. सलामीवीर मॅथ्यू वेड जो स्थिर झाला होता, त्याची विकेट मिळून दिली. ट्रॅव्हिस हेडला १७ वर बाद करत मोहम्मद सिराजने ऑस्ट्रेलियाला पाचवा धक्का दिला. हेड बाद झाला तेव्हा ऑस्ट्रेलियाची अवस्था ५ बाद ९८ अशी झाली होती. डेडच्या जागी आलेल्या कर्णधार टीम पेनला जडेजाने माघारी पाठवले. जडेजाच्या चेंडू पेनच्या बॅटला हलकासा स्पर्श करुन गेला. अंपायरने बाद न दिल्याने कर्णधार अजिंक्यने स्वत: हून DRS घेतला आणि भारताला एक मोठी विकेट मिळाली. भारताकडून रविंद्र जडेजाने सर्वाधिक २ विकेट घेतल्या. तर जसप्रीत बुमराह, उमेश यादव, मोहम्मद सिराज आणि आर अश्विन यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3aQHNkv
No comments:
Post a Comment