मुंबई: 2nd test ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. या सामन्यासाठी भारतीय संघात चार बदल करण्यात आले आहेत. पृथ्वी शॉच्या जागी शुभमन गिल तर वृद्धीमान साहाच्या जागी ऋषभ पंतचा जागा दिली गेली आहे. भारताचा नियमीत कर्णधार बाळाच्या जन्मासाठी मायदेशात आल्याने अजिंक्य रहाणेकडे कर्णधारपद देण्यात आले आहे. वाचा- अजिंक्य रहाणेकडे भारतीय संघाचे नेतृत्व दोन वर्षानंतर आले आहे. याआधी त्याने जून २०१८ मध्ये नेतृत्व केले होते. कर्णधार म्हणून तिनही प्रकारच्या क्रिकेटमध्ये त्याने आतापर्यंत सात सामने खेळले आहेत. त्यापैकी सहा सामन्यात विजय मिळून दिला आहे. त्याच्या विजयाची टक्केवारी ८६ टक्के इतकी आहे. वाचा- जिक्स या नावाने रहाणे ओळखला जातो. त्याची विजयाची टक्केवारी भारताचा नियमीत कर्णधार विराट कोहलीपेक्षा २४ टक्के अधिक आहे. विराटच्या नेतृत्वाखाली भारताने ५६ कसोटी, ९२ वनडे आणि ४० टी-२० सामने खेळले आहेत. त्यापैकी ३३ कसोटी, ६३ वनडे आणि २४ टी-२० सामन्यात विजय मिळवला आहे. विराटची कसोटीमधील विजयाची टक्केवारी ५९ इतकी, वनडेमधील ६८ टक्के आणि टी-२० मधील ६० टक्के इतकी आहे. कोहलीने डिसेंबर २०१४ साली कसोटीचे कर्णधारपद स्विकारले होते. त्यानंतर ही तिसरी वेळ आहे की तो संघाचे नेतृत्व करत नाही. याआधी दोन वेळा विराटच्या गैरहजेरीत अजिंक्यने संघाचे नेतृत्व केले होते. अजिंक्यने ज्या दोन कसोटी सामन्यात नेतृत्व केले आहे, त्या सामन्यात भारताने विजय मिळवलाय. मार्च २०१७ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध धर्मशाळा कसोटीत भारताने ८ विकेटनी तर जून २०१८ साली बेंगळुरू येथे अफगाणिस्तानविरुद्ध भारताने एक डाव आणि २६२ धावांनी विजय मिळवला. वनडेत जुलै २०१५ मध्ये झिम्बाब्वे विरुद्ध संघाचे नेतृत्व केले होते. त्या मालिकेत भारताने तीनही सामन्यात विजय मिळवला होता. राहणेच्या नेतृत्वाखाली वनडेत भारताच्या विजयाची टक्केवारी १०० टक्के इतकी आहे. तर टी-२० मध्ये जुलै २०१५ मध्ये रहाणेने विराट कोहलीच्या गैरहजेरीत संघाचे नेतृत्व केले होते. तेव्हा भारताने ३ पैकी दोन सामन्यात विजय मिळवला होता. पण त्यानंतर रहाणेकडे वनडे किंवा टी-२०चे नेतृत्व दिले नाही.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3mMEopd
No comments:
Post a Comment