नवी दिल्ली: ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यात सुरू असलेल्या कसोटी मालिकेवरील करोना व्हायरसचे संकट अद्याप पूर्णपणे गेलेले नाही. सिडनी शहरात करोना रुग्णांची संख्या वाढल्याने भारत विरुद्धच्या अखेरच्या दोन कसोटी सामन्याची स्थळे बदलण्याचा विचार क्रिकेट ऑस्ट्रेलिया करत आहे. वाचा- सिडनी क्रिकेट मैदानावर सात जानेवारीपासून तिसरा कसोटी सामना होणार आहे. तर चौथा आणि अखेरचा कसोटी सामना १५ जानेवारी रोजी ब्रिस्बेन येथे होईल. सिडनी शहरात करोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या वाढल्याने ऑस्ट्रेलिया क्रिकेटच्या अधिकाऱ्यांना अलर्ट करण्यात आले आहे. वाचा- सिडनी मॉर्निंग हेरल्डच्या रिपोर्टनुसार, क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे पहिले प्राधान्य सात ते ११ जानेवारी दरम्यान सिडनी मैदानावर होणारी लढत आणि त्यानंतर ब्रिस्बेन येथे होणारी चौथी लढत यांच्या स्थळातील अदलाबदल करण्याची असेल. तसे झाले तर चौथा कसोटी सामना ब्रिस्बेन ऐवजी सिडनीत १५ ते १९ जानेवारी दरम्यान होऊ शकतो. वाचा- करोना व्हायरसचे प्रमाण वाढल्याने दुखापतीतून बाहेर आलेला ऑस्ट्रेलियाचा फलंदाज डेव्हिड वॉर्नर आणि जलद गोलंदाज सीन एबॉट शनिवारीच सिडनीतून मेलबर्नला आले. मेलबर्नमध्ये २६ डिसेंबरपासून बॉक्सिंग डे कसोटी सामना सुरू होणार आहे. वाचा- ... सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एक पर्याय म्हणून दुसरा आणि तिसरा कसोटी सामना मेलबर्नमध्ये खेळवला जाऊ शकतो. भारताने एडिलेड येथे झालेला पहिला कसोटी सामना आठ धावांनी गमावला होता. ऑस्ट्रेलियाने चार सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3mEbwzk
No comments:
Post a Comment