नवी दिल्ली: भारताचा जलद गोलंदाज () सात वर्षानंतर क्रिकेटच्या मैदानावर परतणार आहे. पुढील महिन्यात सुरू होणाऱ्या टी-२० ( ) क्रिकेट स्पर्धेसाठी केरळ संघात त्याची निवड झाली आहे. मॅच फिक्सिंगच्या आरोपामुळे श्रीसंतवर सात वर्षांची बंदी घालण्यात आली होती. बंदीचा कालावधी संपल्यानंतर ही त्याची पहिलीच स्पर्धा आहे. वाचा- आयपीएलमध्ये स्पॉट फिक्सिंग केल्यामुळे बीसीसीआयने त्यांच्यावर बंदी घातली होती. केरळ क्रिकेट बोर्डाने १० जानेवारीपासून मुंबईत सुरू होणाऱ्या मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेत त्याची निवड केली आहे. श्रीसंतवरील बंदीचा कालावधी या वर्षी सप्टेंबर महिन्यात संपला होता. मुश्ताक अली स्पर्धेच्या आधी तो अळपुळ्ळा येथे टी-२० स्पर्धा खेलणार होता. पण करोना व्हायरसमुळे ही स्पर्धा रद्द करण्यात आली. राज्य क्रिकेट बोर्डाने मुश्ताक अली स्पर्धेसाठी संघाचे नेतृत्व संजू सॅमसनकडे सोपवले आहे. सचिन बेबी हा उपकर्णधार असेल. वाचा- केरळच्या संघात निवड झाल्यानंतर श्रीसंतने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात तो म्हणतो, एक खचलेला माणूस पुन्हा स्वत:ला उभा करू शकतो. त्याच्या सारखा मजबूत कोणीच असू शकत नाही. तुम्ही सर्वांनी दिलेले समर्थन आणि प्रेम यासाठी आभारी. वाचा- ... या व्हिडिओत केरळ संघातील अन्य खेळाडू त्याचे स्वागत करताना दिसत आहेत. श्रीसंतने त्याची अखेरची मॅच आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सकडून ९ मे २०१३ रोजी खेळली होती. तर अखेरची आंतरराष्ट्रीय मॅच ऑगस्ट २०११ साली इंग्लंडविरुद्ध ओव्हर मैदानावर खेळली. इंग्लंडविरुद्धच्या त्या सामन्यात श्रीसंतने ३ विकेट घेतल्या होत्या.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3hvxELq
No comments:
Post a Comment