मेलबर्न, : विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताला ऑस्ट्रेलियातील पहिल्या कसोटी सामन्यात मानहानीकारक पराभव पत्करावा लागला होता. पण दुसऱ्या कसोटी सामन्यात अजिंक्य रहाणेकडे भारताचे नेतृत्व आले आणि भारताला विजय मिळाला. या विजयानंतर कोहली आणि अजिंक्य यांची तुलना भारताचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी केली आहे. रवी शास्त्री या विजयानंतर म्हणाले की, " भारताचा नियमित कर्णधार विराट कोहली हा आक्रमक असतो. मैदानात त्याच्यामध्ये प्रचंड जोश असतो. पण माझ्यामते अजिंक्यचा स्वभाव त्याच्या पूर्णपणे विरुद्ध आहे. अजिंक्य हा शांत स्वभावाचा कर्णधार आहे. पण अजिंक्य शांत असला तरी तो चांगलाच चलाख आहे." अजिंक्यच्या शांत स्वभावामुळे झाला हा फायदा... अजिंक्यबाबत रवी शास्त्री म्हणाले की, " अजिंक्य शांत असला तरी तो एक चतुर कर्णधार आहे. त्याला खेळ चांगला कळतो आणि त्याचे खेळाबाबतचे अंदाजही चांगले असतात. अजिंक्यच्या शांत स्वभावाचा फायदा यावेळी भारतीय संघांतील खेळाडूंना झाला, खासकरून गोलंदाजांना. दुसऱ्या डावात गोलंदजी करत असताना उमेश यादवला दुखापत झाली. उमेश त्यानंतर मैदानात उतरला नाही. पण अजिंक्य त्यानंतर विचलित झाला नाही. त्याने रणनिती बदलत सर्व काम चोख बजावले." सामन्याच्या टर्निंग पॉइंट काय होता...या सामन्याचा टर्निंग पॉइंट नेमका काय होता, याबाबत रवी शास्त्री यांनी आपले मत व्यक्त केले. शास्त्री म्हणाले की, " या सामन्यात अविश्वसनीय संयम पाहायला मिळाला. अजिंक्य रहाणेचे शतक हा या सामन्याचा टर्निंग पॉइंट होता, असे मला वाटते. रहाणेने या सामन्यात ११२ धावा केल्या, त्यामुळे भारताला पहिल्या डावात ३२६ धावा करता आल्या आणि ऑस्ट्रेलियावर १३१ धावांची आघाडी घेता आली. तिसऱ्या सामन्यासाठी भारतीय संघातून दोन खेळाडूंना डच्चू मिळू शकतो, असे वाटत आहे. तिसऱ्या सामन्यासाठी सलामीवीर मयांक अगरवाल आणि हनुमा विहारी या खेळाडूंना संघाबाहेर ठेवले जाऊ शकते. त्याचबरोबर संघात रोहित शर्मा आणि लोकेश राहुल यांना स्थान देण्यात येऊ शकते. त्याचबरोबर एक महत्वाचा बदल भारतीय संघात होऊ शकतो. भारताचा वेगवान गोलंदाज उमेश यादव हा दुसऱ्या सामन्यात दुखापतग्रस्त झाला आहे. त्यामुळे तो तिसऱ्या सामन्यात खेळणार की नाही, याबाबत साशंकता आहे. त्याचबरोबर मोहम्मद शमीही दुखापतीमुळे या दौऱ्यात खेळू शकणार नाही. त्यामुळे तिसऱ्या सामन्यात जर उमेश खेळू शकणार नसेल, तर त्याच्या जागी मराठमोळा शार्दुल ठाकूर किंवा नवदीप सैनी या दोन युवा वेगवान गोलंदाजांना संधी मिळू शकते. त्यामुळे तिसऱ्या सामन्यात नेमके कोणते बदल होतात, याची उत्सुकता सर्वांनाच असेल.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/34TXa89
No comments:
Post a Comment