मेलबर्न, : भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज हा पहिल्याच कसोटी सामन्यात चांगला चमकला. पण सिराजला पहिल्यांदा संधी नेमकी कशी मिळाली होती आणि त्याच्यामधील गुणवत्ता नेमकी कोणी हेरली, जाणून घ्या... सिराजचे वडिल रिक्षा चालवायचे. त्यामुळे त्याचे लहानपणी त्याला क्रिकेटचे प्रशिक्षण मिळू शकले नाही. सिराज हा गल्ली क्रिकेट खेळायचा. गल्लीमध्ये सिराजचा सामना करायला सर्वच घाबरायचे. पण गल्लीच्यापुढे काही सिराज खेळायला जात नव्हता. एकेदिवशी त्या गल्लीतील एका भाजी विक्रेत्याने चारमिनार सीसी क्लबचे मालक मोहम्मद अहमद यांना ही गोष्ट सांगितली. त्यानंतर अहमद यांनी सिराजला आपल्या क्लबकडून खेळण्याची संधी दिली आणि त्यानंतर सिराजचे आयुष्यचं बदलून गेले. या आठवणींना उजाळा अहमद यांनी एका मुलाखतीमध्ये दिला. याबाबत अहमद म्हणाले की, " मी सिराजला चारमिनार क्रिकेट क्लबमध्ये खेळायला बोलावले. २०१५ हे ते वर्ष होते. सिराजने या सामन्यात आपल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर अर्धा संघच गारद केला, त्याने प्रतिस्पर्धी संघातील पाच फलंदाजाना बाद केले. त्यानंतरच्या सामन्यात सिराजने १३ बळी मिळवले. या कामगिरीनंतर सिराजने कधीच मागे वळून पाहिले नाही." सिराजने त्यानंतर अथक मेहनत घेतली आणि त्याचवर्षी त्याची निवड रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत झाली. पण त्यावर्षी तो फक्त एकच सामना खेळू शकला. पण त्यानंतर २०१६ साली मात्र सिराज हा हैदराबादचा सर्वाधिक बळी मिळवणारा गोलंदाज होता. या वर्षात त्याने ४१ बळी रणजी स्पर्धेत घेतले होते. त्यानंतर सिराजची गोलंदाजी ही प्रकाशझोतात येऊ लागली आणि सिराजला भारतीय संघातही स्थान मिळाले. आपल्या पहिल्याच ट्वेन्टी-२० सामन्यामध्ये सिराजने न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यम्सनची विकेट मिळवली होती. आयपीएलमध्ये सिराज २०१७ साली आला. हैदराबादच्या संघाने सिराजला मूळ किंमतीपेक्षा १३ पट रक्कम यावेळी दिली. त्यावेळी २.६० कोटी रुपयांमध्ये हैदराबादने सिराजला आपल्या संघात स्थान दिले होते. पण त्यानंतर पुढच्याच म्हणजे २०१८ साली आरसीबीच्या संघाची त्याच्यावर नजर गेली आणि त्यांनी सिराजला आपल्या संघात स्थान दिले. त्यानंतर गेल्या दोन वर्षांपासून सिराज हा आरसीबीकडून खेळत आहे. आजच्या केकेआरविरुद्धच्या सामन्यात तर सिराजने तिखट मारा करत चार षटकांमध्ये तीन फलंदाजांना बाद करत फक्त आठ धावाच दिल्या होत्या.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3pu4GhK
No comments:
Post a Comment