Ads

Tuesday, December 8, 2020

IND vs AUS : ऑस्ट्रेलियाच्या संघाला बसू शकतो मोठा धक्का, प्रशिक्षकांनीच दिली अपडेट

सिडनी, : ऑस्ट्रेलियाच्या संघाला अजून एक मोठा धक्का बसू शकतो, असे म्हटले जात आहे. ऑस्ट्रेलिाचे प्रशिक्षक जस्टीन लँगर यांनी याबाबतची अपडेट एका मुलाखतीमध्ये शेअर केली होती. त्यामुळे आता ऑस्ट्रेलियाचा संघ या मोठ्या धक्क्यातून कसा सावरणार, याकडे चाहत्यांचे लक्ष लागलेले आहे. ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज फलंदाज डेव्हिड वॉर्नरला दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात दुखापत झाली होती. त्यामुळे वॉर्नर भारताविरुद्धच्या ट्वेन्टी-२० मालिकेत खेळू शकला नाही. पण वॉर्नरची दुखआपत गंभीर असून तो पहिल्या कसोटी सामन्यात खेळू शकणार नाही, असे वृत्त रेडिफ डॉट कॉम या संकेतस्थळाने दिले आहे. त्याचबरोबर वॉर्नरचा जागी नेमका कोणता खेळू संघात येऊ शकतो, याबाबतही या वृत्तामध्ये सांगण्यात आले आहे. वॉर्नरला झालेली दुखापत ही गंभीर स्वरुपाची आहे. या दुखापतीमधून तो अजूनही सावरलेला नाही. त्यामुळे या दुखापतीमधून फिट होण्यासाठी वॉर्नरला काही वेळ लागू शकतो. त्यामुळे वॉर्नर जर पहिला कसोटी सामना खेळणार नसले तर त्याच्या जागी ऑस्ट्रेलियाच्या 'अ' विल्यम पोकुवस्कीला संघात स्थान देण्यात येऊ शकते, असे दिसत आहे. याबाबत ऑस्ट्रेलियाचे प्रशिक्षक जस्टीन लँगर यांनी सांगितले की, " वॉर्नरची दुखापत ही गंभीर स्वरुपाची आहे आणि त्याला वेदनाही होत आहेत. त्यामुळे कदाचित तो पहिल्या कसोटी सामन्यात खेळू शकणार नाही. पण संघ निवडण्यासाठी आमच्यावर जास्त दडपण नसेल. कारण ऑस्ट्रेलियाच्या 'अ'संघातील खेळाडू जहे चांगली कामगिरी करत आहेत. त्यामुळे त्यांच्यापैकी एकाची निवड आम्ही वॉर्नरच्या जागी संघात करू शकतो. पण दुसरीकडे आमचे लक्ष वॉर्नऱवरही असेल. कारण वॉर्नर हा आमच्यासाठी सर्वात महत्वाचा खेळाडू आहे. त्यामुळे तो कधी पूर्णपणे फिट होू शकतो, याकडे आम्ही डोळे लावून बसलो आहोत. काही दिवसांतच वॉर्नरबाबतचे चित्र स्पष्ट झालेले आपल्याला पाहायला मिळेल." ऑस्ट्रेलियाचा कर्णधार आरोन फिंचलाही पहिल्या ट्वेन्टी-२० सामन्यानंतर दुखापत झाली होती. त्यामुळे त्याला दुसऱ्या ट्वेन्टी-२० सामन्यात खेळता आले नव्हते. त्यावेळी ऑस्ट्रेलियाच्या संघाचे नेतृत्व हे स्टीव्हन स्मिथकडे सोपवण्यात आले होते. पण आता तिसऱ्या ट्वेन्टी-२० सामन्यात मात्र फिंच खेळायला मैदानात उतरला आहे.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3gsjM4e

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...