मुंबई : भारताचा धडाकेबाज फलंदाज रोहित शर्मा हा सध्याच्या घडीला आपल्या फिटनेसवर लक्ष देत आहे. पण त्याचबरोबर रोहित सध्याच्या घडीला शांतपणे वेळ व्यतित करण्यासाठी एक बंगला शोधत आहे. रोहितने गेल्या आठवड्यात एका खास जागेला भेट दिली आणि तो प्रॉपर्टी खरेदी करण्यासाठी उत्सुक असल्याचे तेथील स्थानिकांनी सांगितले आहे. रोहित गेल्या आठवड्यात दक्षिण मुंबईतून थेट अलिबागला बंगला पाहण्यासाठी गेला होता, असे वृत्त मुंबई मिररने दिले आहे. रोहितने यावेळी काळे टी-शर्ट आणि काळा मास्क परीधान केला होता. त्याचबरोबर काळ्या रंगाची थ्री-फोर्थ पँट त्याने घातली होती. रो-रो फेरीमध्ये रोहितने आपली गाडी घेतली होती आणि तो थेट अलिबागला बंगला पाहण्यासाठी गेला होता, असे सूत्रांनी सांगितले आहे. रोहितला दुखापत झाली होती. त्यामुळेच त्याला ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाता आले नव्हते. त्यामुळेच रोहित सध्याच्या घडीला बंगळुरुतील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये आपल्या फिटनेसवर लक्ष देत आहे. पण या कार्यक्रमामध्ये रोहितला एका दिवसाची सुट्टी देण्यात आली होती. त्यावेळी रोहित हा अलिबागला जाऊन एक खास बंगला बघून आल्याचे तेथील स्थानिकांनी सांगितले आहे. याबाबत बीसीसीआयच्या सूत्रांनी सांगितले की, " रोहित सध्याच्या घडीला राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये आपल्या फिटनेसवर लक्ष देत आहे. पण या पूर्ण कार्यक्रमात रोहितला सुट्टी मिळाली होती. त्यावेळी रोहित बंगळुरुहून बाहेर गेला होता. पण रोहित नेमका कुठे गेला होता, याबाबत आम्ही सांगू शकत नाही. कारण रोहितबरोबर यावेळी बीसीसीआयची कोणतीही व्यक्ती नव्हती. त्यामुळे या सुट्टीमध्ये रोहित कुठे गेला होता, हे आम्ही सांगू शकत नाही." रोहित हा सध्याच्या घडीला बंगळुरुतील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये आपल्या फिटनेसवर जास्त लक्ष देत आहे. रोहितची फिटनेस चाचणी ११ डिसेंबरला होणार आहे. या चाचणीत रोहित जर पास झाला तरच त्याला ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाता येणार आहे. रोहितने आपल्या इंस्टाग्रावर एक पोस्ट टाकली आहे. या पोस्टमध्ये रोहितने आपला नवीन फोटो अपलोड केला आहे. या फोटोमध्ये रोहितमध्ये बराच फरक झाल्याचे पाहायला मिळत आहे. रोहितचा हा फोटो चांगलाच व्हायरल झाला असून चाहत्यांनाही रोहितच्या या नवीन लूकला पसंती दिली आहे. त्याचबरोबर रोहित आता कधी मैदानात उतरणार आणि त्याचा खेळ कधी पाहायला मिळणार, याची उत्सुकता चाहत्यांना आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/33RVX0D
No comments:
Post a Comment