Ads

Friday, December 11, 2020

निवृत्तीनंतर केला धमाकेदार विक्रम, पाहा भारतीय खेळाडूची टी-२०मधील कामगिरी

नवी दिल्ली: भारताचा अष्ठपैलू इरफान पठाणने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून भलेही निवृत्ती घेतली असली तरी क्रिकेटमध्ये तो अद्याप लीग स्पर्धा खेळतोय. इरफान सध्या लंका प्रीमियर लीग स्पर्धेत कॅडी टसकर्सकडून खेळत आहे. वाचा- इरफानने लंका प्रीमियर लीग स्पर्धेत जाफना स्टालियस विरुद्ध खेळताना त्याने १९ चेंडूत २५ धावा केल्या, यात चार चौकारांचा समावेश होता. यासह त्याने टी-२० क्रिकेटमध्ये दोन हजार धावा पूर्ण केल्या. इरफानने टी-२० क्रिकेटमध्ये २ हजार धावा आणि १५० विकेट घेतल्या आहेत. अशी कामगिरी करणारा तो दुसरा भारतीय खेळाडू ठरलाय. वाचा- भारताकडून याआधी अशी कामगिरी फक्त रविंद्र जडेजाने केली आहे. जडेजाने टी-२० क्रिकेटमध्ये २२७ साम्यात ही कामगिरी करुन दाखवली होती. तर इरफानने फक्त १८० सामन्यात हा विक्रम केला. भारताकडून टी-२० क्रिकेटमध्ये सर्वात वेगाने २ हजार धावा आणि १५० विकेट घेणारा खेळाडू ठरला आहे. वाचा- टी-२० करिअरमध्ये जडेजाने आतापर्यंत २५२ सामन्यात २ हजार ५८६ धावा आणि १६४ विकेट घेतल्या आहेत. तर इरफानने १८० सामन्यात २ हजार ९ धावा आणि १७३ विकेट घेतल्या आहेत. इरफानने या वर्षाच्या सुरुवातीला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. पण टी-२० खेळणार असल्याचे तो बोलला होता.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3nayyz4

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...