Ads

Friday, December 11, 2020

आमची मुंबई... मुंबईत भेटल्यावर मराठीतच बोलणार, हार्दिक पंड्याचा भन्नाट व्हिडीओ व्हायरल

मुंबई : मराठी भाषेबद्दल आणि मुंबईबाबतचा अभिमान भारताचा धडाकेबाज खेळाडू हार्दिक पंड्याच्या बोलण्यातून एका व्हिडीओमधून जाणवला आहे. हार्दिक हा व्हिडीओ आता सोशल मीडीयावर चांगलाच व्हायरल झाला आहे. हार्दिकचा हा व्हिडीओ मुंबई इंडियन्सने पोस्ट केला आहे. मुंबई इंडियन्सचा संघ जेव्हा आयपीएलसाठी सराव करत होता, तेव्हाचा हा व्हीडिओ आहे. या व्हिडीओमध्ये हार्दिक म्हणाला की, " काय म्हणताय... सगळं बरं का? आमची मुंबई... खूप खूप छान. सगळं बरं आहे, पण इथे युएईमध्ये ऊन खूप आहे. मी अजून मराठी शिकणार आहे आणि जोपण मला मुंबईमध्ये भेटणार त्याच्याबरोबर मी मराठीमध्येच बोलणार आहे. मला मराठी बोलायला आता यायला लागलं आहे, त्याच़बरोबर मला मराठी भाषाही कळते. सूर्यकुमार यादव हा माझा मराठीचा शिक्षक आहे." ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ट्वेन्टी-२० मालिकेत हार्दिकला मालिकावीराचा पुरस्कार मिळाला होता. पण हा पुरस्कार त्याने युवा वेगवान गोलंदाज टी. नटराजनला दिला होता. त्यावेळीही चाहत्यांनी हार्दिकचे कौतुक केले होते. आता हार्दिकचा हा व्हिडीओ कौतुकाला पात्र ठरला आहे. त्याचबरोबर चाहत्यांना हा व्हिडीओ आता चांगलाच पंसतीस पडला आहे. आयसीसीच्या क्रमवारीतही हार्दिकने चांगले गुण कमावले आहेत. वर्ल्डकप २०१९ नंतर पहिला वनडे सामना खेळणारा भारताचा अष्ठपैलू हार्दिक पंड्याने पहिल्या वनडे ९० आणि तिसऱ्या वनडेत नाबाद ९२ धावा केल्या. क्रमवारीत तो पहिल्यांदा ५५३ गुणांसह टॉप-५० जणांमध्ये आला आहे. हार्दिक फलंदाजांच्या यादीत ४९व्या स्थानावर आहे. रविवारी सिडनीत झालेल्या टी-२० लढतीत भारताला आक्रमक फलंदाजीची गरज होती. विजयासाठी १२ धावांचे रनरेट हवे असताना हार्दिकने फक्त २२ चेंडूत ४२ धावा करत फक्त मॅच नाही तर मालिका देखील जिंकून दिली. सामना झाल्यानंतर कर्णधार विराट कोहलीने त्याचे कौतुक केले. इतक नव्हे तर सोशल मीडियावर देखील सर्व जण त्याचे कौतुक करत आहेत. हार्दिकचे कौतुक करणाऱ्यांमध्ये इंग्लंडच्या एका महिला क्रिकेटपटूचा समावेश आहे. इंग्लंडची देखील पंड्याच्या फलंदाजीने हैराण झाली. पंड्याच्या धमाकेदार फलंदाजीवर हार्टलीला विश्वास बसला नाही. तिने ट्विटकरून हार्दिकचे कौतुक केले आहे. तु खरच हे करून दाखवले आहेस? या ट्विटसोबत तिने काही इमोजी वापरले आहेत.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/378iYyl

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...