सिडनी, : भारताचा क्रिकेटपटू वृद्धिमान साहाचा एक भन्नाट कॅच सध्याच्या घडीला क्रिकेट विश्वामध्ये चर्चेचा विषय बनला आहे. चाहत्यांना साहाने पकडलेली कॅच ही फर आवडली असून या कॅचचा व्हिडीओ आता चांगलाच व्हायरल झालेला पाहायला मिळत आहे. ही गोष्ट घडली ती भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरु असलेल्या दुसऱ्या सराव सामन्यात. या सामन्यात रिषभ पंत हा यष्टीरक्षण करत होता, पण साहाने यावेळी आपल्याकडे आलेली या कॅचची संधी सोडली नाही. मोहम्मद सिराजच्या १६व्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर ऑस्ट्रेलियाच्या निक मॅडिसनने जोरदार फटका लगावला. हा फटका आता चौकार जाणार असे वाटायला लागले होते. पण या चेंडूच्या मागे विरुद्ध दिशेने साहा धावत गेला. चेंडूच्या विरुद्ध दिशेने धावणे सोपे नसते. पण साहाने यावेळी चेंडूचा पाठलाग केला आणि एक भन्नाट कॅच पकडली. साहाच्या या कॅचचा व्हिडीओ आता चांगलाच व्हायरल झाला आहे. सराव सामन्याच्या पहिल्या दिवशी भारतीय संघ आघाडीवर असल्याचे पाहायला मिळत आहे. कारण जसप्रीत बुमराच्या अर्धशतकाच्या जोरावर भारताने १९४ धावा केल्या होत्या. या धावा माफक वाटत असल्या तरी भारताच्या गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाची फलंदाजी बेचिराख केली. भारतीय गोलंदाजांनी अचूक आणि भेदक मारा केल्यामुळे ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव १०८ धावांवर सर्वबाद झाला आहे. भारताकडून वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आणि नवदीप सैनी यांनी प्रत्येकी ३-३ विकेट्स मिळवले. बुमराने यावेळी दोन फलंदाजांना बाद केले, तर नवदीप सैनीला एक बळी मिळवता आला. भारताच्या फलंदाजांना कसोटी सामन्यापूर्वी सराव करण्याची ही अखेरची संधी असेल. आतापर्यंत भारताला दोन्ही सराव सामन्यांमध्ये चांगली सुरुवात करता आलेली नाही. पहिल्या सामन्यात तर दोन्ही सलामीवीर झटपट बाद झाले होते. या दुसऱ्या सामन्यात भारताचा सलामीवीर मयांक अगरवालला फक्त दोनच धावा बनवता आल्या. मयांकने आयपीएलमध्ये दमदार कामगिरी केली होती. पण ऑस्ट्रेलियातील वनडे मालिकेत मयांक धावा करण्यात अपयशी ठरला होता. त्याचबरोबर सराव सामन्यातही मयांककडून जास्त धावा होत नसल्याचेच पाहायला मिळत आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/39ZTy7I
No comments:
Post a Comment