सिडनी: भारतीय संघातील युवा खेळाडू ( ) गेल्या काही काळापासून फॉर्ममध्ये दिसत नाही. आयपीएलच्या १३व्या हंगामात त्याने चांगली सुरुवात केली होती. पण नंतर दिल्ली कॅपिटल्सकडून त्याला काही लय मिळाली नाही. त्यामुळेच पृथ्वी शॉला संघाबाहेर ठेवण्यात आले होते. वाचा- पृथ्वीला ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील कसोटी संघात स्थान देण्यात आले. पण त्याआधीच्या सराव सामन्यात त्याची कामगिरी निराशजनक झाली. यामुळे सोशल मीडियावर त्याला ट्रोल केले जात आहे. पृथ्वी शॉने गेल्या १० डावात ०,०,७,१०,९,०,०,१९,४० आणि ३ अशा धावा केल्या आहेत. सिडनीत सुरू असलेल्या डे-नाइट सराव सामन्यात पृथ्वीने पहिल्या डावात टी-२० स्टाइलने फलंदाजी केली. पण सलग ३ चौकार मारून तो बोल्ड बाद झाला. त्याने २९ चेंडूत ४० धावा केल्या. दुसऱ्या डावात तो ३ धावांवर बाद झाला. वाचा- पृथ्वीच्या या खराब कामगिरीमुळे अनेकांनी त्याला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. काही धावा केल्यानंतर पृथ्वी म्हणतो, चला आता मी जातो. दुसऱ्या एका युझरने मिर्जापूर २ मधील डायलॉगसह पृथ्वीचा फोटो शेअर केला आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/34n4NDV
No comments:
Post a Comment