Ads

Monday, February 15, 2021

IPL मधील या संघाने केला नावात बदल; असे आहे नवे नाव

नवी दिल्ली: आयपीएलच्या १४व्या हंगामासाठीचा लिलाव येत्या १८ फेब्रुवारी रोजी चेन्नईत होणार आहे. प्रत्येक संघ नव्या हंगामासाठी लिलावाच्या तयारीत आहेत. अशातच एका संघाने मोठा बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. आयपीएलच्या गेल्या आठ हंगामात खेळणाऱ्या संघाने नावात बदल केला आहे. वाचा- एप्रिल महिन्यापासून सुरू होणाऱ्या २०२१च्या हंगामापासून () संघाने नावात बदल केला आहे. यापुढे हा संघ '' ( ) या नावाने ओळखला जाणार आहे. आयपीएलच्या गेल्या हंगामात पंजाब संघाची कामगिरी फार चांगली झाली नव्हती. त्यांना गुणतक्त्यात सहाव्या स्थानावर समाधान मानावे लागले. केएल राहुलच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या पंजाब संघाचा पराभव झाला होता. पण त्यानंतर एका पाठोपाठ एक विजय मिळत त्यांनी क्वालिफायरमध्ये पोहोचण्याचा प्रयत्न केला होता. पण त्यांना यश आले नाही. वाचा- आयपीएलचे सर्व हंगाम खेळणाऱ्या या संघाला अद्याप एकही विजेतेपद मिळवता आले नाही. पंजाबला एकदा उपविजेतेपद तर एकदा तिसऱ्या स्थानापर्यंत पोहोचले आहेत. १४व्या हंगामात हा संघ एका नव्या नावासह मैदानात उतरेल. बीसीसीआयमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंजाब संघ मोठ्या कालावधीपासून नावात बदल करण्याचा विचार करत होता. हा निर्णय अचानक घेतलेला नाही. या आयपीएलच्या आधी बदल करणे योग्य वाटले. मोहित बर्मन, नेस वाडिया, प्रिती झिंटा आणि करण पॉल हे या संघाचे मालक आहेत. वाचा- गेल्या हंगामात पंजाबने केएल राहुलकडे संघाचे नेतृत्व दिले होते. या संघाचे प्रशिक्षक अनिल कुंबळे आहेत. १४व्या हंगामात पंजबाने ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेल याला रिलिझ केले आहे. आता दोन दिवसांनी होणाऱ्या मिनी लिलावात हा संघ कोणत्या खेळाडूंना विकत घेतो हे पाहावे लागले.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3s22ijJ

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...