Ads

Monday, February 15, 2021

IND vs ENG : अश्विनने शतक झळकावत कपिल देव यांनाही मागे टाकले, ठरला भारताचा पहिलाच खेळाडू

चेन्नई, : आर. अश्विनने इंग्लंडविरुद्धच्या आजच्या सामन्यात एक अनोखा पराक्रम केला आहे. अश्विनसारखी कामगिरी आतापर्यंत कोणत्याही भारतीय खेळाडूला करता आलेली नाही. त्याचबरोबर अश्विनने यावेळी कपिल देव, सर गॅरी सोबर्स यांच्यासह बऱ्याच महान क्रिकेटपटूंना पिछाडीवर टाकल्याचे पाहायला मिळत आहे. एकाच सामन्यात पाच विकेट्स आणि शतक झळकावण्याचा पराक्रम अश्विनने या सामन्यात केला आहे. पण अश्विनने हे पहिल्यांदाच केलेले नाही. आतापर्यंत कसोटी क्रिकेटमध्ये तिसऱ्यांदा त्याने अशी कामगिरी केली आहे. भारताकडून कपिल देव आणि रवींद्र जडेजा यांनी अशी कामगिरी यापूर्वी केली होती, पण कपिल आणि जडेजा यांना तिनदा अशी कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळे एकाच सामन्यात पाच विकेट्स आणि शतक तीनवेळा झळकावणारा अश्विन हा पहिलाच भारतीय क्रिकेटपटू ठरला आहे. क्रिकेट विश्वात हा पराक्रम दोन वेळा सर गॅरी सोबर्स, जॅक कॅलिस, शकिब अल हसन, मुश्ताक अहमद यांनी केला आहे. त्यामुळे या सर्वांना आता अश्विनने मागे टाकले आहे. त्याचबरोबर असा पराक्रम करणारा अश्विन हा क्रिकेट विश्वातील दुसरा खेळाडू ठरला आहे. कारण या यादीत पहिल्या स्थानावर इंग्लंडचे माजी क्रिकेटपटू इयान बोथम आहेत, त्यांनी पाचवेळा हा पराक्रम केल्याचे पाहायला मिळत आहे. अश्विनने यावेळी आपलाच एक विक्रम मोडी काढल्याचे पाहायला मिळाले आहे. चेन्नईच्या मैदानात यापूर्वी अश्विनने सर्वाधिक ६७ धावा केल्या होत्या. त्यावेळी प्रतिस्पर्धी संघ इंग्लंडचाच होता. इंग्लंडविरुद्ध २०१६ साली झालेल्या कसोटी सामन्यात अश्विनने ६७ धावांची खेळी साकारली होती. पण आजच्या सामन्यात अश्विनने आपलाच विक्रम मोडीत काढला असून नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे. त्यामुळे घरच्या मैदानात या सामन्यात अश्विनने आतापर्यंतच्या सर्वाधिक धावा केल्याचे पाहायला मिळत आहे. चेन्नईच्या खेळपट्टीवर जिथे फलंदाज धारातिर्थी पडताना पाहायला मिळत होते, त्याच खेळपट्टीवर अश्विनने धडाकेबाज फलंदाजी केली आणि शतक झळकावले.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3u8m5zV

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...