Ads

Tuesday, February 2, 2021

विराटने केली धोनीची कॉपी; व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

चेन्नई: ind vs engभारतीय संघ ५ फेब्रुवारीपासून इंग्लंडविरुद्ध ४ सामन्यांची कसोटी मालिकेतील पहिला सामना खेळणार आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात सुट्टीवर गेलेला भारताचा नियमीत कर्णधार ( ) पुन्हा एकदा मैदानावर कमबॅक करण्यास सज्ज झाला आहे. भारतीय संघाने क्वारंटाइन कालावधी पूर्ण केल्यानंतर सरावाला सुरूवात केली आहे. बीसीसीआयने भारतीय खेळाडूंच्या सराव सत्राचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. वाचा- बीसीसीआयने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये भारतीय खेळाडू विविध प्रकारचे सराव करताना दिसत आहेत. या व्हिडिओमध्ये भारताचा कर्णधार विराट कोहलीचा एक छोटा पार्ट सध्या चर्चेत आला आहे. सराव करताना भारतीय संघातील खेळाडू आनंद घेताना या व्हिडिओमध्ये दिसते. विराटने सराव करताना माजी कर्णधार ()च्या हेलिकॉप्टर शॉट ()ची नकल केली. वाचा- विरटाने धोनीच्या केलेल्या या शॉटची नकल सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. वाचा- इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत विराट कोहलीला काही विक्रम करण्याची संधी आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून १२ हजार धावा पूर्ण करण्याची त्याला संधी आहे. यासाठी त्याला फक्त १८९ धावांची गरज आहे. त्या बरोबर भारतीय मैदानावर इंग्लंडविरुद्ध सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम स्वत:च्या नावावर करण्याची त्याला संधी आहे. इंग्लंडविरुद्ध त्याने ९ सामन्यात ८४३ धावा केल्या आहेत. या यादीत सुनिल गावस्कर १ हजार ३३१ धावांसह पहिल्या तर सचिन तेंडुलकर ९६० धावांसह दुसऱ्या स्थानावर आहे. चेतेश्वर पुजाराने इंग्लंडविरुद्ध भारतात ८३९ धावा केल्या आहेत. भारत आणि इंग्लंड यांच्यातील चार सामन्यांच्या कसोटी मालिकेपैकी पहिल्या दोन लढती चेन्नईतील चिंदबरम मैदानावर होणार आहेत. त्यानंतरच्या दोन लढती अहमदाबादच्या मोटेरा मैदानावर होतील.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/36Bnuor

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...