Ads

Wednesday, February 3, 2021

क्रिकेटमधील नवा वर्ल्ड रेकॉर्ड; अशी कामगिरी करणारा जगातील पहिला खेळाडू

ढाका: भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकरच्या नावावर कसोटी आणि वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम आहे. तर टी-२० मध्ये हा विक्रम सध्या भारतीय कर्णधार विराट कोहलीच्या नावावर आहे. देशाकडून खेळताना तिनही प्रकारच्या क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम आजपर्यंत कोणत्याही क्रिकेटपटूला करता आला नव्हता. पण आता हा विक्रम एका क्रिकेटपटूने करून दाखवला आहे. बांगलादेशचा फलंदाज () याने वनडे, टी-२० आणि कसोटी या तिनही प्रकारच्या क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम केला आहे. तो जगातील एकमेव असा क्रिकेटपटू आहे ज्याने देशाकडून खेळताना सर्व प्रकारच्या क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा केल्या. वाचा- तमीम इकबाल हा जगातील एकमेव क्रिकेटपटू आहे ज्याने कसोटी, टी-२० आणि वनडेत सर्वाधिक धावा केल्या. जगातील अन्य कोणत्याही देशातील क्रिकेटपटूला अशी कामगिरी करता आलेली नाही. सध्या बांगलादेश आणि वेस्ट इंडिज () यांच्यात कसोटी मालिका सुरू आहे. या मालिकेआधी तमीम वनडे आणि टी-२० मध्ये बांगलादेशकडून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता. कसोटीत विकेटकिपर मुशफिकुर रहीमला मागे टाकत त्याने तिनही प्रकारात अव्वल स्थान मिळवले. वाचा- चटगाव येथील अहमद चौधरी स्टेडियमवर सुरू असलेल्या सामन्यात ९वी धाव घेत त्याने हा विक्रम केला. तमीमने बांगलादेशकडून ६१ कसोटीत ९ शतकांसह ४ हजार ४१४ धावा केल्या आहेत. तर रहीमने ७० कसोटीत ७ शतक आणि २१ अर्धशतकासह ४ हजार ४१३ धावा केल्या आहेत. तमीमने हा विक्रम केला आणि तो लगेच बाद झाला. वाचा- या कसोटीत रहीम देखील खेळत आहे. जर त्याने दोन धावा केल्या तर पुन्हा कसोटीत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम त्याच्या नावावर जमा होईल आणि तमीम मागे पडेल. तमीमने वनडेत २१० सामन्यात ७ हजार ३६० धावा केल्या आहेत. यात १३ शतक आणि ४९ अर्धशतकांचा समावेश आहे. तर टी-२० मधील ७४ लढतीत त्याने १ शतक आणि ७ अर्धशतकांसह १ हजार ७०१ धावा केल्या आहेत.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/39EyS4F

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...