Ads

Tuesday, December 8, 2020

IND vs AUS 3rd T20I: भारताचे गचाळ क्षेत्ररक्षण; वेड, मॅक्सवेलकडून धुलाई, ऑस्ट्रेलियाच्या १८६ धावा

सिडनी: भारताविरुद्धच्या तिसऱ्या आणि अखेरच्या टी-२० लढतीत यजमान ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करत ५ बाद १७६ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून मॅथ्यू वेडने धमाकेदार ८० धावा केल्या. त्याला ग्लेन मॅक्सवेलने चांगली साथ दिली. वाचा- तिसऱ्या टी-२० लढतीत भारताचा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आणि कर्णधार एरॉन फिंच यांनी ऑस्ट्रेलियाच्या डावाची सुरूवात केली. पण दुसऱ्याच षटकात वॉशिंग्टन सुंदरने त्यांना पहिला धक्का दिला. त्याने फिंचला शून्यावर बाद केले. त्यानंतर आलेल्या स्टीव्ह स्मिथने वेड सोबत अर्धशतकी भागिदारी केली. ही जोडी भारताची डोकेदुखी ठरेल असे वाटत असताना पुन्हा सुंदरने भारताला ब्रेक मिळवून दिला. त्याने स्मिथची बोल्ड घेतली. तो २३ चेंडूत २४ धावा करून बाद झाला. वाचा- स्मिथच्या जागी आलेल्या ग्लेन मॅक्सवेलने वेडसह आक्रमक फलंदाजी केली. या दोघांनी अर्धशतकी भागिदारी केली. दरम्यान वेडने सलग दुसरे अर्धशतक झळकावले. त्याने ३५ चेंडूत ५० धावा केल्या. युजवेंद्र चहलच्या चेंडूवर मॅक्सवेलचा कॅच केएल राहुलने घेतला होता. पण नो बॉल असल्याने त्याला जीवनदान मिळाले. मॅक्सवेलने या जीवनदानाचा फायदा घेतला. त्याने अर्धशतक झळकावले. १९व्या षटकात शार्दुल ठाकूरने वेडची विकेट घेतली. त्याने ५३ चेंडूत ८० धावा केल्या. अखेरच्या षटकात नटराजनने मॅक्सवेलची बोल्ड घेतली. त्याने ३६ चेंडूत ५४ धावा केल्या. वाचा- भारताकडून वॉशिंग्टन सुंदरने सर्वाधिक २ विकेट घेतल्या. तर टी नटराजन आणि शार्दुलने प्रत्येकी एक विकेट घेतली. भारतीय संघाने ३ सामन्यांच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. या सामन्यात टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाचा पराभव करून क्लीन स्वीप देण्याची संधी आहे.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/36XdKW9

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...