Ads

Monday, December 7, 2020

बॉलीवूडच्या 'या' तीन अभिनेत्री आहेत क्रिकेटपटू रशिद खानच्या फेव्हरेट, विराटची पत्नी अनुष्काचंही घेतलं नाव...

नवी दिल्ली : आयपीएलमध्ये दमदार फिरकी गोलंदाजी करणारा अफगाणिस्तानचा क्रिकेटपटू रशिद खानच्या तीन बॉलीवूड अभिनेत्री फेव्हरेट आहेत. ही माहिती रशिदनेच दिली असून या तीन अभिनेत्रींमध्ये भारताचा कर्णधार विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्माचाही समावेश आहे. रशिदने सोशल मीडियावर तीन अभिनेत्रींचे नाव घेतले आहे. यामध्ये प्रथम अनुष्का शर्माचे नाव आहे. त्याचबरोबर रशिदला प्रीति झिंटाही आवडत असल्याचे त्याने सांगितले आहे. त्याचबरोबर किआरा अडवाणीही आपल्याला आवडत असल्याचे रशिदने या पोस्टमध्ये म्हटले आहे. त्याचबरोबर रशिदने काही दिवसांपूर्वी झालेल्या एका मुलाखतीमध्ये मला आमिर खान आवडतो, असेही म्हटले होते. त्याचबरोबर मला लगान आणि दंगल हे दोन सिनेमे सर्वाधिक आवडतात, असेही रशिदने म्हटले होते. काही दिवसांपूर्वी रशिद आणि अनुष्का यांचे नाव चर्चेत आले होते. कारण गुगलवर रशिद खानची पत्नी, असे सर्च केल्यावर अनुष्का शर्माचे नाव येत होते. त्याचबरोबर त्यांच्या लग्नाची तारीखही दाखवली जात होती. पण ही चूक गुगलची होती आणि त्यानंतर त्यांनी आपली ही चूक सुधारली होती. क्रिकेट आणि बॉलीवूड यांचे फार वर्षांपासूनचे कनेक्शन आहे. त्याचबरोबर परदेशी क्रिकेटपटूंचेही बॉलीवूडबरोबर खास नाते आहे. रशिदने आयपीएल चांगलीच गाजवली होती. आता रशिद हा बिग बॅश लीग खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियामध्ये दाखल झाला आहे. ऑस्ट्रेलियामध्ये पोहोचल्यावर त्याला १४ दिवस क्वारंटाइन व्हावे लागले आहे. यामध्येच रशिदने आपल्या इंस्टाग्रामवर आपल्याला बॉलीवूडमधील कोणत्या अभिनेत्री आवडतात, हे सांगितले आहे. आयपीएलमध्ये रशिद हा सनरायझर्स हैदराबादच्या संघाकडून खेळत होता. त्यावेळी रशिदने अचूक गोलंदाजी केल्याचे पाहायला मिळाले होते. वॉर्नरच्या नेतृत्वाखालील हैदराबादचा संघ प्ले-ऑफमध्येही पोहोचला होता. या हैदराबादच्या प्रवासात रशिदचाही महत्वाचा वाटा होता. कारण रशिदने यावेळी हैदराबादची गोलंदाजीची बाजू चांगल्यापद्धतीने सांभाळली होती. आता रशिद हा ऑस्ट्रेलियामध्ये दाखल झाला आहे. त्यामुळे या बिग बॅश लीगमध्ये रशिदची कामगिरी नेमकी कशी होते, याकडे सर्व चाहत्यांचे लक्ष लागून राहिलेले असेल.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3qB0GgR

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...