Ads

Sunday, December 6, 2020

ऑस्ट्रेलियात हे फक्त टीम इंडियाच करू शकते; वनडेचा बदला घेतला टी-२०मध्ये!

सिडनी: भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० लढतीत सहा विकेटनी विजय मिळवला आणि मालिकेत २-० अशी आघाडी घेतली. ऑस्ट्रेलियात भारताने याआधी २०१६ मध्ये देखील अशीच धमाकेदार कामगिरी केली होती. तेव्हा भारताने टी-२० मालिका ३-० अशी जिंकली होती. ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच मैदानावर प्रथमच एखाद्या संघाने क्लीन स्विप दिला होता. वाचा- सिडनी क्रिकेट मैदानावर झालेल्या आजच्या सामन्यात भारताला विजयासाठी अखेरच्या षटकात १४ धावांची गरज होती. हार्दिक पांड्याने दोन षटकार मारून विजय मिळून दिला. ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करत भारतासमोर विजयासाठी १९५ धावांचे लक्ष्य दिले होते. २०१६ मध्ये देखील भारताची अशीच अवस्था होती. तेव्हा अखेरच्या षटकात भारताला विजयासाठी १७ धावांची गरज होती आणि सुरेश रैनाने चौकार मारून विजय मिळवून दिला होता. वाचा- आजच्या विजयाने भारताने टी-२० प्रकारात सलग १०व्या विजयाची नोंद केली. त्यांनी पाकिस्तानच्या सलग ९ विजयाचा विक्रम मागे टाकला. आता भारतापुढे अफगाणिस्तानचा संघ आहे. त्यांनी २०१६-१७ मध्ये सलग ११ आणि २०१८-१९ मध्ये सलग १२ विजय मिळवले होते. वाचा- ऑस्ट्रेलियामध्ये टी-२० क्रिकेटमध्ये धावांचा यशस्वी पाठलाग करण्याचा विक्रम पुन्हा एकदा भारताने केला. याआधी सिडनी मैदानावर २०१६ साली भारताने १९८ धावा केल्या होत्या. तर आज त्याच मैदानावर भारताने १९५ धावा करत दुसऱ्या क्रमांकाच्या मोठ्या धावसंख्येचा यशस्वी पाठलाग केला. या वर्षात भारताने वेस्ट इंडिज विरुद्ध ३ सामन्यांची, न्यूझीलंड विरुद्ध ५ सामन्यांची मालिका एकतर्फी जिंकली होती आणि आता ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका २ -० अशी जिंकली आहे.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3qtuLit

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...