Ads

Monday, December 7, 2020

भारताच्या पराभवाचे भाकीत करणाऱ्या क्रिकेटपटूला जाफरने दिले चोख उत्तर, पाहा पोस्ट

नवी दिल्ली: ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील पहिल्या दोन वनडे सामन्यात पराभव झालेल्या भारतीय संघाने त्यानंतर सलग तीन विजय मिळवले आणि जोरदार कमबॅक केले. भारताने तिसऱ्या वनडेत विजय मिळवत क्लीन स्विप होऊ दिला नाही. त्यानंतर तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेतील दोन सामन्यात विजय मिळून मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली. वाचा- भारताने काल रविवारी झालेल्या दुसऱ्या टी-२० लढतीत ऑस्ट्रेलियाने दिलेले १९५ धावांचे लक्ष्य यशस्वीपणे पार केले. भारताकडून हार्दिक पंड्याने २२ चेंडूत ४२ धावा करत धडाकेबाज विजय मिळवून दिला. आता मंगळवारी टी-२० मालिकेतील तिसरी आणि अखेरची लढत होईल. तेव्हा भारताला ऑस्ट्रेलियाचा क्लीन स्विप करण्याची संधी असेल. जर भारताने असे केले तर २०२० मध्ये सलग दुसऱ्यांदा भारत परदेशी भूमीवर यजमानांचा क्लीन स्विप करेल. याआधी वर्षाच्या सुरुवातीला भारताने न्यूझीलंडचा ५-० असा पराभव केला होता. वाचा- भारत आणि ऑस्ट्रेलिया यांचे सामने सुरू होण्याआधी इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉनने असे विधान केले होते की, यजमान ऑस्ट्रेलिया भारताचा तिनही मालिकेत पराभव करेल. पण टीम इंडियाने टी-२० मालिकेत विजय मिळून वॉनची भविष्यवाणी चुकीची होती हे सिद्ध केले. वाचा- भारतीय संघाने वॉनच्या ट्वीटवर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. पण भारताचा माजी सलामीवीर वासीम जाफरने टी-२०तील मालिका विजयानंतर वॉनला उत्तर दिले आहे. गेल्या काही काळापासून जाफर सोशल मीडियावर माजी क्रिकेटपटूंना ट्रोल करत आहे. तो मजेशीर पद्धतीने ट्रोल करतो. यावेळी जाफरच्या हाती वॉन सापडला. वाचा- जाफरने वॉनच्या ट्वीटवर प्रतिक्रिया देताना गॅग्स ऑफ वासेपूरमधील एका सीनचा मीम पोस्ट केलाय. वाचा- टी-२० मालिकेनंतर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात १७ डिसेंबरपासून कसोटी मालिका होणार आहे. बॉर्डर-गावसकर मालिकेतील पहिली कसोटी एडिलेट येथे होणार असून हा सामना डे-नाइट आहे. गेल्या वर्षी भारतीय संघाने कसोटी मालिकेत ऑस्टेलियाचा पराभव केला होता. अशी कामगिरी करणारा तो पहिला आशियाई संघ ठरला होता.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3gmvz3V

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...