नवी दिल्ली: पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू सध्या स्पर्धेत खेळत आहे. पण ही स्पर्धा सोडून तो पुन्हा घरी परतला. आफ्रिदी गाले ग्लेडिएटर्स या संघाचे नेतृत्व करत होता. अचानक त्याने LPLमधून माघार घेतली. वाचा- आफ्रिदीने सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे ज्यात त्याने वैयक्तीक कारणामुळे मायदेशात परत असल्याचे सांगितले. आफ्रिदीसोबत लंका प्रीमियर लीग स्पर्धेच्या सोशल मीडियावर आफ्रिदी आणि त्याच्या मुलीचा रुग्णालयातील फोटो शेअर केला गेला आहे. दुर्दैवाने काही वैयक्तीक कारणामुळे मी घरी जात आहे. परिस्थिती सामान्य झाल्यावर मी पुन्हा LPLमध्ये सहभागी होईन. ऑल द बेस्ट! वाचा- आफ्रिदीच्या या ट्वीटनंतर लंका प्रीमीयर लीगने ट्वीटवर एक फोटो शेअर केला ज्यात आफ्रिदी आणि त्याची मुलगी दिसत आहे. हा फोटो रुग्णालयातील आहे. वाचा- जर आफ्रिदी खरच पुन्हा लीग खेळण्यासाठी आला तर त्याला काही दिवस क्वारंटाइन रहावे लागले. आफ्रिदी प्रमाणेच दांबुला वाइकिंग संघाचा जलद गोलंदाज आफताब आलम देखील वैयक्तीक कारणामुळे अफगाणिस्तानला परत गेला आहे. श्रीलंकेचा जलद गोलंदाज लसित मलिंगा आणि पाकिस्तानचा विकेटकीपर सरफराज अहमदने लीग मधून माघार घेतल्याने आफ्रीदीकडे संघाचे नेतृत्व आले होते. आता तो ही उपलब्ध नसल्यामुळे उप कर्णधार भानुका राजपक्षेकडे गाले ग्लॅडिएटर्सचे नेतृत्व देण्यात आले आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2VDLSzP
No comments:
Post a Comment