Ads

Tuesday, December 8, 2020

पदार्पणातच ऑस्ट्रेलियाची झोप उडवली; मलिंगा, बुमराहच्या विक्रमाशी बरोबरी

सिडनी: भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी-२० मालिका २-१ अशी जिंकली. तिसऱ्या सामन्यात भारताचा १२ धावांनी पराभव झाला असला तरी वनडे मालिका गमावल्यानंतर भारताने टी-२० मालिकेत शानदार कामगिरी केली आणि मालिका जिंकली. भारतीय संघाकडून या संपूर्ण मालिकेत जलद गोलंदाज () ने आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये धमाकेदार पदार्पण केले. वाचा- ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-२० मालिकेत भारताने अनुभवी जसप्रीत बुमराहला संधी दिली नाही. कसोटी मालिकेसाठी त्याला विश्रांती दिली गेली होती. त्याच्या अनुउपस्थितीत टी नटराजनने मिळालेल्या संधीचे सोने केले. त्याने तीन सामन्यात एक खास विक्रम स्वत:च्या नावावर केला. नटराजनने ३ सामन्यात ६ विकेट घेतल्या आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-२० सामन्यात एका मालिकेत सर्वाधिक विकेट घेण्याच्या आणि जसप्रित बुमराह या दिग्गज गोलंदाजांशी बरोबरी केली. वाचा- बुमराहने २०१६ साली ऑस्ट्रेलियात त्यांच्याच विरुद्ध टी-२० मालिकेत सहा विकेट घेतल्या होत्या. तर अशीच कामगिरी लसित मलिंगाने २०१७ साली अशी कामगिरी केली. आता पदार्पणाच्या मालिकेत नटराजनने ही कामगिरी केली. नटराजन आणि बुमराहचे आंतरराष्ट्रीय करिअर सारख्याच पद्धतीने सुरू झाले. बुमराहला एका जखमी खेळाडूमुळे पदार्पणाची संधी मिळाली होती. नटराजन देखील दुखापतग्रस्त खेळाडूमुळे संघात आला. या दोघांनी पदार्पणाच्या सामन्यात दोन विकेट घेतल्या. आणि त्यानंतर दुसऱ्या टी-२० सामन्यात ३ तर तिसऱ्या टी-२० सामन्यात १ विकेट घेतील. इतक नव्हे तर बुमराहने देखील पहिल्या वनडेत दोन विकेट घेतल्या होत्या. या दोन्ही खेळाडूंबद्दलचा हा अजब योगायोग आहे. वाचा- टी नटराजनच्या शानदार कामगिरीमुळेच भारताचा माजी स्फोटक फलंदाज विरेंद्र सेहवागने पुढील वर्षी होणाऱ्या टी-२० वर्ल्डकपमध्ये मोहम्मद शमीच्या आधी नटराजनला संधी मिळाली पाहिजे असे म्हटले आहे. ऑस्ट्रेलियामध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-२० मध्ये सर्वाधिक विकेट घेणारे गोलंदाज टी नटराजन- ६ विकेट (२०२०) लसित मलिंगा- ६ विकेट (२०१७) जसप्रीत बुमराह- ६ विकेट (२०१६) बुमराह आणि नटराजन यांचा योगायोग पहिली वनडे: २ विकेट पहिली टी-२०: ३ विकेट दुसरी टी-२०: २ विकेट तिसरी टी-२०: १ विकेट


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2IpFA3E

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...