सिडनी: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात भारताने सहा विकेटनी विजय मिळवला आणि मालिकेत २-० अशी विजयी आघाडी मिळवली. या विजयासह भारताचा कर्णधार विराट कोहलीने एक खास विक्रम स्वत:च्या नावावर केला. वाचा- हा भारताचा असा कर्णधार ठरला आहे ज्याने देशाला ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंडमध्ये टी-२० मालिका जिंकली आहे. याआधी कोणत्याही भारतीय कर्णधाराने या तिनही देशात जाऊन टी-२० मालिका जिंकली नव्हती. त्याच बरोबर विराटने ऑस्ट्रेलियात जाऊन तिनही फॉर्मेटमध्ये मालिका जिंकली आहे. वाचा- २०१८-१९ साली भारताने ऑस्ट्रेलियाला त्यांच्यात मैदानावर कसोटी मालिकेत पराभूत केले होते. त्यानंतर वडने मालिकेत देखील पराभूत केले. विराट कोहली वगळता दक्षिण आफ्रिकेच्या फाफ डु प्लेसीस असा दुसरा कर्णधार आहे ज्याने ऑस्ट्रेलियामध्ये तिनही प्रकारात मालिका विजय मिळवला आहे. वाचा- या वर्षी भारताला वनडे मालिकेत २-१ असा पराभव झाला होता. पण तिसऱ्या वनडे विजय मिळवत भारताने जोरदार कमबॅक केले. आता दोन्ही संघात तिसऱ्या टी-२० सामन्यानंतर चार सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे. पहिला कसोटी सामना १७ डिसेंबरपासून एडिलेट येथे होणार असून ही लढत डे-नाइट असेल. हा सामना खेळल्यानंतर विराट कोहली भारतात परत येणार आहे. वाचा- विराटच्या गैरहजेरीत कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेकडे नेतृत्व दिले जाऊ शकते. सध्या ऑस्ट्रेलिया अ आणि भारत अ यांच्यात सुरू असलेल्या सराव सामन्यात अजिंक्यने शतक झळकावले आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3mQvGav
No comments:
Post a Comment