Ads

Wednesday, December 2, 2020

यॉर्कर स्पेशलिस्टचे टीम इंडियाकडून पदार्पण; तिसऱ्या वनडेत धमाका करणार?

कॅनबेरा: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या वनडे सामन्यात भारतीय संघाने चार बदल केले. तिसऱ्या वनडेत शुभमन गिल, शार्दुल ठाकूर, आणि कुलदीप यादव यांना संधी दिली गेली. यात यॉर्कर किंग अशी ओळख असलेल्या टी नटराजन याने वनडे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. या पदार्पणाबरोबरच नटराजन याने एक खास विक्रम केला. वाचा- आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताकडून डाव्या हाताने गोलंदाजी करणारा तो ११ खेळाडू ठरला. ९९० वनडे इतिहासात नटराजनच्या आधी घवरी रुद्र प्रताम सिंग, राशिद पटले, जहीर खान, आशिष नेहरा, इरफान पठाण, रुद्र प्रताम सिंह, जयदेव उनाडकट, बरिंदर सरन आणि खलील अहमद यांनी भारताकडून गोलंदाजी केली. वाचा- भारताचा कर्णधार विराट कोहलीने वनडे कॅप देत त्याचे स्वागत केले. वनडेत खेळणारा तो भारताचा २३२वा खेळाडू ठरला. भारताकडून ऑस्ट्रेलियात करिअरची सुरूवात करणाऱ्या खेळाडूंमध्ये नटराजनचा समावेश झाला आहे. याआधी जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, विजय शंकर यांनी पदार्पण केले. २०१६ मध्ये बुमराहने तर २०१९ मध्ये सिराज आणि शंकर यांनी पदार्पण केले होते. वाचा- एन नटराजनने २० प्रथम श्रेणी सामन्यात ६४ विकेट तर १५ लिस्ट ए सामन्यात १६ विकेट घेतल्या आहेत. टी-२० त्याने ३८ लढतीत ३५ विकेट घेतल्या आहेत. आयपीएलच्या १३व्या हंगामात त्याने १८ विकेट घेतल्या होत्या.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2HYTmKq

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...