सिडनी: भारताविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० लढतीत ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजीकरत ५ बाद १९४ धावा केल्या आहेत. भारतीय संघाला मालिका विजयासाठी १९५ धावांची गरज आहे. तीन सामन्यांच्या मालिकेत भारताने १-० अशी आघाडी घेतली आहे. वाचा- ... भारताचा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलिया आणि भारत या दोन्ही संघात आज प्रत्येकी तीन बदल करण्यात आले. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार एरॉन फिंचच्या ऐवजी मॅथ्यू वेड संघाचे नेतृत्व करत होता. तर भारतीय संघात मोहम्मद शमीच्या जागी शार्दुल ठाकूर, मनिष पांडेच्या जागी श्रेयस अय्यर आणि रविंद्र जडेजाच्या जागी युजवेंद्र चहलला संधी देण्यात आली. वेड आणि डार्सी शॉर्टने संघाला चांगली सुरुवात करून दिली. ही जोडी धोकादायक ठरत असताना टी नटराजनने शॉर्टला ९ धावांवर माघारी पाठवले. पण दुसऱ्या बाजूने वेडने धमाकेदार फलंदाजी सुरू ठेवली होती. त्याने २५ चेंडूत अर्धशतक केले. वाचा- वॉशिंग्टन सुंदरच्या आठव्या षटकात वेडने मारलेला चेंडू विराटकडे कॅच आला होता. पण त्याने तो सोडला. याच चेंडूवर धाव घेण्याचा प्रयत्न करताना तो धावबाद झाला. त्याच्या जागी आलेल्या मॅक्सवेलने आक्रमक फलंदाजी केली. पण धावांचा वेग वाढवण्याच्या प्रयत्नात तो बाद झाला. शार्दुल ठाकूरने त्याची विकेट घेतली. वनडेत भारतीय गोलंदाजांची धुलाई करणाऱ्या स्मिथने आज आक्रमक फलंदाजी केली. चहलने १८व्या षटकात त्याला ४७ धावांवर बाद केले. १९व्या षटकात नटराजनने हेनरिकेसची विकेट घेत ऑस्ट्रेलियाला पाचवा धक्का दिला. वाचा- भारताकडून टी नटराजनने सर्वाधिक २ विकेट घेतल्या. तर चहल आणि ठाकूरने प्रत्येकी १ विकेट घेतली.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/36KIKs8
No comments:
Post a Comment