Ads

Sunday, February 14, 2021

IND vs ENG : रोहित शर्मा आता चेन्नईत शतक करु शकत नाही, भारताच्याच खेळाडूचे वादग्रस्त विधान

चेन्नई, : रोहित शर्माने पहिल्या सामन्यात दमदार दीडशतक झळकावले होते. रोहितच्या धमाकेदार फलंदाजीमुळेच भारताला मोठी धावसंख्या उभारता आली होती. रोहित शर्मा दुसऱ्या डावात २५ धावांवर नाबाद आहे. पण रोहित चेन्नईतील या डावात शतक झळकावू शकत नाही, असे वादग्रस्त विधान भारताच्याच एका माजी क्रिकेटपटूने केल्याचे पाहायला मिळत आहे. या गोष्टचा व्हिडीओही चांगलाच व्हायरल झाला आहे. भारताचा माजी क्रिकेटपटू आणि समालोचक आकाश चोप्राने यावेळी आपल्या एका व्हिडीओमध्ये सांगितले आहे की, " चेन्नईतील दुसऱ्या डावात आता कोणताही फलंदाज शतक झळकावू शकत नाही, तो रोहित शर्मा असला तरी नाही. रोहित शर्मा यावेळी अर्धशतक झळकावू शकतो. त्याचबरोबर तो ७०पेक्षा जास्त धावा करु शकतो, पण तो शतक मात्र झळकावू शकत नाही." भारतीय संघ किती धावांची आघाडी घेऊ शकतो, पाहा...आकाशने तिसऱ्या दिवशी भारतीय संघ किती धावांची आघाडी घेऊ शकतो, याबाबतही आपले मत व्यक्त केले आहे. आकाश म्हणाला की, " भारतीय संघ दुसऱ्या डावात ४५० धावांची आघाडी घेऊ शकतो. भारताने जर ४५० धावांची आघाडी घेतली तर त्यांचा विजय जवळपास निश्चित होऊ शकतो. त्यामुळे भारतीय संघाने जर एवढी मोठी आघाडी घेतली तर ते सामना जिंकून मालिकेत १-१ अशी बरोबरी करु शकतात." तिसऱ्या दिवशी इंग्लंडचा संघ किती विकेट्स गमावू शकतो, पाहा...तिसऱ्या दिवशी इंग्लंडचा संघ किती विकेट्स गमावू शकतो, याबाबतही भाष्य केले आहे. याबाबत आकाश म्हणाला की, " तिसऱ्या दिवशी जर इंग्लंडच्या संघाची फलंदाजी आली तर ते किमान दोन किंवा त्यापेक्षा जास्त विकेट्स गमावू शकतात. त्याचबरोबर तिसऱ्या दिवशी जो रुट आणि बेन स्टोक्स या अनुभवी खेळाडूंनाही फलंदाजी करताना अडचणी येऊ शकतात." मोईन अली मिळवू शकतो तीन विकेट्सइंग्लंडचा फिरकीपटू मोईन अली दुसऱ्या डावात किती विकेट्स मिळवू शकतो, याबाबतही आकाशने आपले मत मांडले आहे. याबाबत आकाशा म्हणाला की, " मोईन अलीने पहिल्या डावात चार बळी मिळवले होते. पण दुसऱ्या डावात अलीला तीन विकेट्स मिळतील, असे मला वाटते."


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3rL4eNk

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...