Ads

Friday, February 5, 2021

भारताविरुद्ध धावांचा डोंगर उभा करायचा आहे इंग्लंडला, रुटने ठेवले हे टार्गेट

चेन्नई: इंग्लंडचा कर्णधार ()ने भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या पहिल्याच दिवशी शानदार शतक झळकावले. १००व्या कसोटीत शतक करणाऱ्या रूटने भारताविरुद्धच्या पहिल्या डावात धावांचा डोंगर उभा करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. इंग्लंडने पहिल्या दिवशी टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता आणि ३ बाद २६३ धावा केल्या होत्या. वाचा- कसोटी करिअरमध्ये ९८,९९ आणि १००व्या अशा सलग तीन कसोटीत शतक करणाऱ्या रुटने पहिल्या डावात ६०० ते ७०० धावा करण्याचे टार्गेट असल्याचे सांगितले. पहिल्या दिवशी रूटने भारताच्या फिरकीपटू आणि जलद गोलंदाजांचा यशस्वीपणे सामना केला. दुसऱ्या दिवसाच्या खेळाबद्दल बोलताना रुट म्हणाला, मी मोठी धावसंख्या उभी करण्याचा विचार करत आहे. वाचा- पहिल्या दिवसाच्या अखेरच्या सत्रात पायात गोळे आल्याने मी थोडा निराश झालो होतो. पण विराट कोहलीने मला मदत केली. ही त्याची खेळभावना आहे. आम्ही अधिक धावा करण्याचा प्रयत्न करू. जर ६०० ते ७०० केल्या तर तिसऱ्या दिवशी गोष्टी आमच्यासाठी सोप्या असतील. दुसऱ्या दिवशी पूर्ण दिवस आम्ही फलंदाजी करू शकतो, असे रूट म्हणाला. जो रूट सध्या शानदार फॉर्ममध्ये आहे. त्याने श्रीलंकेविरुद्ध दोन कोसटीत शतक आणि द्विशतक झळकावले होते. वाचा- रूटने पहिल्या दिवशी डोमिनिक सिबली सोबत तिसऱ्या विकेटसाठी २०० धावांची भागिदारी केली. सिबली पहिल्या दिवसाच्या अखेरच्या षटकात ८७ धावांवर बाद झाला. त्याला जसप्रीत बुमराहने बाद केले. त्याआधी रुटने कसोटीमधील २०वे आणि सलग तिसरे शतक पूर्ण केले.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3cL2NtW

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...