Ads

Wednesday, December 9, 2020

IND vs AUS: कसोटी मालिकेआधी यजमान ऑस्ट्रेलियाला धक्का; भारताचे पारडे झाले जड

सिडनी: भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेआधी ऑस्ट्रेलिया संघाला मोठा झटका बसला आहे. यजमान ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यात १७ डिसेंबरपासून चार सामन्यांची कसोटी मालिका सुरू होणार आहे. याआधी झालेल्या वनडे मालिकेत ऑस्ट्रेलियाने तर टी-२० मालिकेत भारताने विजय मिळवला होता. आता दौऱ्यातील अखेरच्या मालिकेत कोण विजय मिळवते याची सर्वांना उत्सुकता आहे. वाचा- कसोटी मालिकेची सुरूवात डे-नाइट टेस्टने होणार आहे. पहिली कसोटी एडिलेट येथे होईल. पण या सामन्याआधी ऑस्ट्रेलियाला सर्वात मोठा धक्का बसला आहे. ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज सलामीवीर ( ) पहिल्या कसोटीला मुकणार आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने बुधवारी ही माहिती दिली. वॉर्नर बॉक्सिंग डे कसोटीसाठी उपलब्ध होण्याची शक्यता आहे. वाचा- वॉर्नरला भारताविरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात दुखापत झाली होती. तेव्हा त्याने ८३ धावा केल्या होत्या. पण फिल्डिंग करताना त्याला दुखापत झाली आणि मैदानाबाहेर जावे लागले. दुखापतीबद्दल बोलताना वॉर्नर म्हणाला, मला वाटते की अतिशय कमी वेळेत मी रिकव्हर झालो आहे. त्यामुळे सिडनीत होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यात मी खेळू शकेन असे वाटते. दुखापतीतून मी बाहेर आलोय. आता संघाकडून खेळण्यासाठी १०० टक्के फिट होण्याची गरज आहे. वाचा- ऑस्ट्रेलिया संघात वॉर्नरच्या जागी पहिल्या कसोटी सामन्यात कोणाला संधी मिळेल हे अद्याप स्पष्ट झाले नाही. कॅमरन ग्रीन याचे नाव चर्चेत आहे. भारत अ विरुद्ध झालेल्या सामन्यात त्याने नाबाद शतक केले होते. या शिवाय विल पुकोनस्की आणि अनुभवी बर्न्स जो याला यांना देखील संधी मिळण्याची शक्यता आहे.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3lUQ2xL

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...