Ads

Saturday, April 10, 2021

RCBच्या हर्षलने इतिहास घडवला; मुंबई इंडियन्स विरुद्ध केला सर्वात मोठा विक्रम

चेन्नई: आयपीएलच्या १४व्या हंगामातील पहिल्या लढतीत रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने गतविजेत्या मुंबई इंडियन्सचा २ विकेटनी पराभव केला. मुंबईने प्रथम फलंदाजी करत बेंगळुरूपुढे विजयासाठी १६० धावांचे आव्हान दिले होते. अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या या सामन्यात बेंगळुरूने अखेरच्या चेंडूवर सनसनाटी विजय मिळवला. या सामन्यात लक्ष्याचा पाठलाग करताना बेंगळुरूचा संघ जेव्हा मागे पडला होता. तेव्हा एबी डिव्हिलियर्सने धमाकेदार फलंदाजी केली आणि संघाला विजया जवळ पोहोचवले. पण त्याआधी गोलंदाजीत बेंगळुरूच्या हर्षल पटेलने शानदार कामगिरी केली. वाचा- मुंबईच्या डावात अखेरच्या म्हणजेच २०व्या षटकात हर्षल पटेलला हॅटट्रिकची संधी होती. त्याने पहिल्या चेंडूवर क्रुणाल पंड्या त्यानंतर कायरन पोलार्डची विकेट घेतली. मात्र तिसऱ्या चेंडूवर थोडक्यात विकेट मिस झाली. पण चौथ्या चेंडूवर त्याने विकेट घेतली. हर्षलने अखेरच्या चेंडूवर फक्त दोन धावा दिल्या. या सामन्यात त्याने चार षटकात फक्त २७ धावा देत पाच विकेट घेतल्या. या कामगिरीसह त्याने आयपीएलच्या इतिहासात आजवर मुंबई इंडियन्सविरुद्ध कोणालाही जमले नाही अशी विक्रमी कामगिरी केली. वाचा- आयपीएलच्या १३ हंगामात आजवर एकाही गोलंदाजाला विरुद्ध पाच विकेट घेता आल्या नाहीत. हर्षल पटेलने हा विक्रम स्वत:च्या नावावर केला. त्याने हार्दिक पंड्या, इशान किशन, क्रुणाल पंड्या, कायरन पोलार्ड, मार्को जेनसन यांची विकेट घेतली. बेंगळुरु संघाने हर्षलला २० लाख रुपयांत विकत घेतले होते. या पराभवासह मुंबई इंडियन्सने आयपीएलच्या पहिल्या सामन्यात पराभूत होण्याची गेल्या ८ वर्षाची परंपरा या वर्षी देखील कामय ठेवली. मुंबईला २०१२ पासून एकदाही पहिली लढत जिंकता आलेली नाही.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2QavK9B

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...