नवी दिल्ली : मुंबई इंडियन्सच्या संघासाठी एक खेळाडू आता डोकेदुखी ठरताना दिसत आहे. कारण आतापर्यंतच्या सर्व सामन्यांमध्ये तो सातत्याने अपयशी ठरताना दिसत आहे. त्यामुळे या पुढच्या सामन्यांमध्ये त्याला संघात कायम ठेवणार का, हा प्रश्न आता चाहत्यांना पडला आहे. मुंबई इंडियन्सचा संघ आतापर्यंत चेन्नईमध्ये पाच सामने खेळला आहे. या पाच सामन्यांमध्ये अष्टपैलू कृणाल पंड्याला चांगली कामगिरी करता आलेली नाही. कारण या पाच सामन्यांमध्ये कृणालला फक्त २९ धावा करता आल्या आहेत. त्याचबरोबर आजच्या सामन्यात तर कृणाल हा महागडा गोलंदाज ठरला. कारण त्याच्या एकाच षटकात राजस्थानच्या फलंदाजांनी १२ धावा लुटल्या. त्यानंतर मात्र कृणाल रोहितने गोलंदाजीच दिली नाही. त्याचबरोबर आतपर्यंतच्या पाच सामन्यांमध्ये कृणालने तीन विकेट्सच मिळवल्या आहेत. त्यामुळे एक अष्टपैलू खेळाडू म्हणून कृणाल हा सातत्याने अपयशी ठरताना दिसत आहे. आतापर्यंतच्या सामन्यांमध्ये इशान किशन हा अपयशी ठरताना दिसत होता. पण त्याला आजच्या सामन्यात संघाबाहेर काढण्यात आले. हाच निर्णय रोहित कृणालबाबतही घेणार का, याकडे सर्वांचे लक्ष असेल. कारण आतापर्यंत कृणाल आणि त्याचा भाऊ हार्दिक पंड्या सातत्याने अपयशी ठरताना दिसत आहे. त्यामुळे या दोघांपैकी एकाल तरी डच्चू देण्याता कठोर निर्णय यावेळी रोहित घेणार का, हे पाहावे लागेल. मुंबई इंडियन्सकडून राजस्थानविरुद्धच्या सामन्यात झाल्या या चुका... गोलंदाजी हे मुंबई इंडियन्सच्या संघाचे बलस्थान होते. पण आजच्या सामन्यात मात्र राजस्थानच्या फलंदाजांनी मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजीवर सुरुवातीला चांगलाच प्रहार केल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे त्यांना या सामन्यात मोठी धावसंख्या उभारता आली. मुंबई इंडियन्सचा गोलंदाजी प्रशिक्षक शेन बॉंडने यावेळी संघाबाबत चिंता व्यक्त केली. शेनने सामना सुरु असताना सांगितले की, " पहिल्या काही षटकांमध्ये मुंबई इंडियन्सला काही चांगल्या संधी मिळाल्या होत्या. पण या संधीचे सोने मात्र त्यांना करता आले नाही." पहिल्या सहा षटकांमध्ये यावेळी मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांना एकही विकेट मिळवता आली नव्हती. यावेळी राजस्थानच्या सलामीवीरांनी मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजीचा चांगलाच समाचार घेतला होता. पहिल्या सहा षटकांमध्ये राजस्थानचा संघ जवळपास १०च्या सरासरीने धावा जमवत होता. पण मुंबई इंडियन्सला मात्र पहिल्या सहा षटकांमध्ये एकही यश मिळवता आले नव्हते.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3nywNwz
No comments:
Post a Comment