नवी दिल्ली: आयपीएल २०२१ मधील आजच्या डबल हेडलमधील पहिली लढत मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात सुरू आहे. या लढतीमध्ये मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. वाचा- आयपीएलच्या १४व्या हंगामात गत विजेत्या मुंबई इंडियन्सने पाच पैकी ३ लढती गमावल्या आहेत. त्यामुळे ही लढत त्यांच्यासाठी महत्त्वाची आहे. रोहित या सामन्यात संघात बदल करेल अशी शक्यता होती. त्याच प्रमाणे त्याने बद केला देखील. मधळ्या फळीतील फलंदाज इशान किशनच्या जागी नाथन कूल्टर नाइल याला संघात घेण्यात आहे. वाचा- आतापर्यंत झालेल्या पाच सामन्यात इशान किशनला धावा करता आल्या नव्हत्या. गेल्या पाचही सामन्यात मुंबईच्या मधळ्या फळीतील फलंदाजांना धावा करण्यात अपयश आले होते. यामुळेच कर्णधार रोहित आणि संघ व्यवस्थापनाने हा बदल केला असावा. या हंगामात मुंबई इंडियन्सला आतापर्यंत एकदाही १७०-१८० धावा करता आल्या नाहीत, याबद्दल वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार ब्रायन लाराने देखील काळजी व्यक्त केली होती. वाचा- असा आहे मुंबई इंडियन्सचा संघ- मुंबई इंडियन्स- रोहित शर्मा (कर्णधार), क्विंटन डी कॉक, सूर्यकुमार यादव, नाथन कूल्टर नाइल, हार्दिक पंड्या, क्रुणाल पंड्या, कायरन पोलार्ड, जयंत यादव, राहुल चहर, जसप्रीत बुमराह, ट्रेंट बोल्ट
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3t2r0Av
No comments:
Post a Comment