मुंबई : आजच्या सामन्यात विराट कोहलीच्या आरसीबीच्या संघाला मानहानीकारक पराभव पत्करावा लागला. कारण चेन्नई सुपर किंग्सच्या संघासमोर त्यांचे पानीपत झाल्याचे पाहायला मिळाले. पण या पराभवानंतर कोहलीला अजून एक मोठा धक्का बसला आहे. कोहलीचा यावेळी ट्वेन्टी-२० क्रिकेमधील एक महत्वाचा विक्रम आता मोडी निघाला आहे. पाकिस्तानच्या बाबर आझमने आज हा पराक्रम करत कोहलीचा विक्रम मोडीत काढलयाचे पाहायला मिळाले आहे. कोहलीला कोणता मोठा धक्का बसला, पाहा...आतापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ट्वेन्टी-२० सामन्यांमध्ये सर्वात जलद दोन हजार धावा करण्याचा विक्रम यापूर्वी कोहलीच्या नावावर होता. पण हा विक्रम आता आझमच्या नावावर झाला आहे. कोहलीने आंतरराष्ट्रीय ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये ५६ सामन्यांमध्ये दोन हजार धावा पूर्ण केल्या होत्या, पण आझमने यावेळी फक्त ५२ सामन्यांमध्ये दोन हजार धावा पूर्ण केल्या आहेत. त्यामुळे आंतरराष्ट्रीय ट्वेन्टी-२० सामन्यांमध्ये आता सर्वात जलद दोन हजार धावा करण्याचा विक्रम कोहलीच्या नावावर राहीलेला नाही. त्यामुळे या पराभवानंतर कोहलीसाठी हादेखील एक मोठा धक्का असेल. आंतरराष्ट्रीय ट्वेन्टी-२० सामन्यांमध्ये सर्वात जलद दोन हजार धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीमध्ये तिसऱ्या स्थानावर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार आरोन फिंच आहे. कारण फिंचने ६२ सामन्यांमध्ये ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये दोन हजार धावा पूर्ण केल्या होत्या. या यादीमध्ये चौथ्या स्थानावर न्यूझीलंडचा माजी कर्णधार ब्रेंडन मॅक्युलम आहे, त्याने ६६ सामन्यांमध्ये दोन हजार धावा पूर्ण केल्या होत्या. या यादीत पाचव्या स्थानावर न्यूझीलंडचा मार्टिन गप्तील आहे. आजच्या सामन्यात आरसीबीला लाजीरवाणा पराभव पत्करावा लागला. चेन्नईच्या संघाने या सामन्यात आरसीबीला ६९ धावांनी पराभूत करत धुळ चारली आणि गुणतालिते अव्वल स्थान पटकावले आहे. चेन्नईचा रनरेट एवढा चांगला आहे की, दुसऱ्या सामन्यात दिल्लीने विजय मिळवला तरी चेन्नईचा संघ अव्वल स्थानावर राहू शकतो. त्यामुळे आजच्या दिवशी तरी चेन्नईचा संघ अव्वल स्थानावर कायम राहू शकतो, असे चित्र आहे. आरसीबीचा संघ सध्या दुसऱ्या स्थानावर आहे, पण दिल्लीने विजय साकारल्याव त्यांना तिसऱ्या स्थानावरही जावे लागू शकते.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3sN19wd
No comments:
Post a Comment