नवी दिल्ली: आयपीएलच्या १४व्या हंगामातील २३व्या साखळी लढतीत मुंबई इंडियन्सने राजस्थान रॉयल्सवर ७ विकेटनी विजय मिळवला. मुंबईच्या विजयात सलामीवीर क्विंटन डी कॉकने शानदार अर्धशतकी खेळी केली. मुंबईच्या या विजयाने त्याचे ६ सामन्यात ३ विजयासह ६ गुण झाले असून ते गुणतक्त्यात चौथ्या स्थानावर कायम आहेत. वाचा- विजयासाठी १७२ धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या मुंबईच्या डावाची सुरूवात रोहित शर्मा आणि क्विंटन डी कॉक यांनी केली. या जोडीने पहिल्या विकेटसाठी ४९ धावा केल्या. चांगल्या सुरूवातीनंतर मुंबईला पहिला धक्का बसला. कर्णधार रोहित शर्मा १४ धावांवर बाद झाला. त्याला ख्रिस मॉरिसने बाद केले. त्यानंतर आलेला सूर्यकुमार यादव देखील १६ धावा करून माघारी परतला. वरच्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या क्रुणाल पंड्याने ३९ धावा केल्या. क्विंटन डी कॉकने ५० चेंडूत २ षटकार आणि ६ चौकारांसह नाबाद ७० तर पोलार्डने नाबाद १६ धावा केल्या. वाचा- त्याआधी मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. जोस बटलर आणि यशस्वी जयसवाल यांनी राजस्थानला चांगली सुरूवात करून दिली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी ७.४ षटकात ६६ धावा करून दिल्या. बटलर ४१ धावांवर बाद झाला. त्याला राहुल चहरने बाद केले. त्यानंतर यशस्वी ३२ धावांवर माघारी परतला. त्याची विकेट देखील राहुलने घेतली. संजू आणि शिवम दुबे यांनी संघाला १५०च्या जवळ पोहोचवले. दुबे ३५ धावांवर बाद झाला. तर संजू २७ चेंडूत ४२ धावा करून माघारी परतला. वाचा- मुंबई इंडियन्सकडून राहुल चहरने सर्वाधिक २, बोल्ट आणि बुमराहने प्रत्येकी एक विकेट घेतली.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/32ZjHiq
No comments:
Post a Comment