![](https://maharashtratimes.com/photo/82240944/photo-82240944.jpg)
मुंबई: आयपीएलच्या १४व्या हंगामात मुंबई इंडियन्सचा कर्णधार याला १२ लाख रुपयांचा दंड करण्यात आला. मुंबई संघाने एका सामन्यात धीम्या गतीने गोलंदाजी केल्याने कर्णधार रोहितला हा दंड करण्यात आला. रोहितवर करण्यात आलेल्या या कारवाईबद्दल एका माजी क्रिकेटपटूने आनंद व्यक्त केलाय. वाचा- मध्ये धीम्या गतीने गोलंदाजी केल्याबद्दल मुंबई इंडिन्सचा कर्णधार रोहित शर्मा आणि कोलकाता नाइट रायडर्सचा कर्णधार यांना दंड करण्यात आला होता. या कारवाईबद्दल इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू केव्हिन पीटरसन याने समाधान व्यक्त केले आहे. टी-२० क्रिकेटमध्ये उशिर होण्यास कोणतीही जागा नाही. कारण हे एक मनोरंजन पॅकेज आहे यात कोणतीही छेडछाड नको. वाचा- ला जाणार बेटवे डॉट कॉमवर त्याच्या ब्लॉगमध्ये पीटरसन म्हणतो, हा खेळाडूंसाठी एक महान संदेश आहे. रोहित शर्मा आणि इयान मॉर्गन यांना या आठवड्यात धीम्या गतीने गोलंदाजी केल्याबद्दल दंड करण्यात आला. टी-२० प्रकारात अनावश्यक वेळ घालवता कामा नये. प्रेक्षकांना तीन तासात हा खेळ पाहता आला पाहिजे. मला आठवते की मी जेव्हा २००४ साली पहिल्यांदा टी-२० मॅच खेळली होती. तेव्हा स्कोअर बोर्डवर टायमर लावला जायचा. तेवढ्या वेळेत ओव्हर पूर्ण करायच्या असायच्या. यात कोणतीही तडजोड केली जायची नाही. आयपीएलच्या १४व्या हंगामात रोहित आणि मॉर्गन यांच्या आधी चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्र सिंह धोनीला देखील अशाच प्रकारे दंड करण्यात आला होता.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3gHf9oT
No comments:
Post a Comment