मुंबई: मध्ये सनरायझर्स हैदराबाद()ला मोठा झटका बसला आहे. संघातील स्टार जलद गोलंदाज ( ) आगामी संपूर्ण हंगामातून बाहेर झाला आहे. संघातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गुढघ्याच्या दुखापतीमुळे टी नटराजन आयपीएलमध्ये एकही सामने खेळू शकणार नाही. नटराजनला दुखापतीमुळे अखेरचे दोन सामने खेळता आले नव्हते. वाचा- आयपीएलच्या १४व्या हंगामात हैदराबादचा पहिल्या तीन लढतीत पराभव झाला होता. त्यानंतर त्यांनी पंजाब विरुद्ध विजय मिळवला. गुणतक्यात ते पाचव्या स्थानावर आहेत. या हंगामात नटराजनला पहिल्या दोन लढती संघाला योगदान देण्यात आले. या दोन सामन्यात त्याने दोन विकेट घेतल्या. वाचा- टी नटराजनचे आयपीएलमधून बाहेर होणे फक्त हैदराबादसाठी नाही तर भारतीय संघाची काळजी वाढवणारे आहे. भारतीय संघाला या वर्षी टी-२० वर्ल्डकप खेळायचा आहे. भारतीय संघाच्या टी-२० नियोजनात नटराजनचा देखील समावेश आहे. त्यामुळे बीसीसीआय देखील त्याच्या दुखापतीवर लक्ष ठेवून आहे. सध्या आयपीएलमध्ये हैदराबाद संघाला त्याची जास्त गरज होती. आता उर्वरीत हंगामासाठी संघात कोणत्या खेळाडूला स्थान मिळते हे पाहावे लागले. सनरायझर्स हैदराबादची आयपीएल २०२१ मधील आतापर्यंतीच कामगिरी मॅच १- कोलकाता विरुद्ध १० धावांनी पराभव मॅच २- बेंगळुरूविरुद्ध ६ विकेटनी पराभव मॅच ३- मुंबईविरुद्ध १३ धावांनी पराभव मॅच ४- पंजाब विरुद्ध ९ विकेटनी विजय
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/32EUWHY
No comments:
Post a Comment