मुंबई : विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील आरसीबीच्या संघाने राजस्थान रॉयल्सला एकामागून एक धक्के दिले. राजस्थानच्या फलंदाजांकडून यावेळी काही चुका घडल्या आणि त्याचा फटका त्यांना या सामन्यात बसला. राजस्थानच्या एकाही फलंदाजाला यावेळी आक्रमक फलंदाजी करता आली नाही. सातत्याने त्यांचे फलंदाज बाद होत गेले आणि त्याचाच फटका त्यांना या सामन्यात बसला. अखेरच्या षटकांमध्ये राहुल तेवितायाने दमदार फटकेबाजी केली आणि त्यामुळेच राजस्थानला आरसीबीपुढे १७८ धावांचे सन्मानजनक आव्हान ठेवता आले नाही. वानखेडेवर दोनशे धावांचा पल्लाही गाठता येऊ शकतो, पण तोपर्यंत टराजस्थानला या सामन्यात पोहोचता आले नाही. तेवातियाने यावेळी २३ चेंडूंत ४० धावा करता आल्या. विराटने यावेळी नाणेफेक जिंकली आणि राजस्थानला प्रथम फलंदाजी करण्यासाठी पाचारण केले. पण आरसीबीचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने यावेळी सुरुवातीलाच राजस्थानला दोन मोठे धक्के दिले. सिराजने यावेळी सलामीवीर जोस बटलरला त्रिफळाचीत करत राजस्थानला पहिला धक्का दिला. बटलरला यावेळी आठ धावा करता आल्या. सिराजने त्यानंतर डेव्हिड मिलरलाही बाद केले, मिलरला यावेळी भोपळाही फोडता आला नाही. राजस्थानची ३ बाद १८ अशी दयनीय अवस्था झाली होती. त्यानंतर संजू सॅमसनने काही काळ धडाकेबाज फलंदाजी केली खरी, पण षटकार ठोकल्यानंतर वॉशिंग्टन सुंदरच्या दुसऱ्याच चेंडूवर तो बाद झाला. संजूने यावेळी दोन चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर २१ धावा केल्या. संजू बाद झाल्यावर काही काळ शिवम दुबे आणि रायन पराग यांची चांगली भागीदारी झाल्याचे पाहायला मिळाले. या दोघांनी यावेळी पाचव्या विकेटसाठी ६६ धावांची भागीदारी रचली. पण यावेळी पराग २५ धावांवर आऊट झाला आणि ही त्यांची भागीदारी संपुष्टात आली. पराग बाद झाला असला तरी शिवम चांगली फटकेबाजी करत होता. पण यावेळी शिवमचे अर्धशतक फक्त चार धावांनी हुकले. शिवमला यावेळी केन रीचर्डसनने बाद केले. शिवमने यावेळी ३२ चेंडूंत पाच चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर ४६ धावा केल्या. शिवम बाद झाल्यावर राहुल तेवातियाने जोरदार फटकेबाजी केली.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2QLEymC
No comments:
Post a Comment