नवी दिल्ली: मध्ये गुरुवारी झालेल्या लढतीत मुंबई इंडियन्सने राजस्थान रॉयल्सवर ७ विकेटनी विजय मिळवला. राजस्थानने प्रथम फलंदाजी करत मुंबई समोर विजयासाठी १७२ धावांचे लक्ष्य दिले होते. मुंबईने १९व्या षटकात ३ विकेटच्या बदल्यात विजय मिळवला. वाचा- आयपीएलच्या १४व्या हंगामात मुंबई इंडियन्सचा आतापर्यंत ६ पैकी तीन सामन्यात विजय तर तीन सामन्यात पराभव झालाय. आजच्या विजयाचा मुंबई इंडियन्सला गुणतक्याच्या दृष्टीने फायदा झाला नाही की तोटा देखील झाला नाही. राजस्थानविरुद्धच्या सामन्याआधी मुंबई गुणतक्त्यात चौथ्या स्थानावर होते आणि विजयानंतर देखील ते चौथ्या क्रमांकावरच आहेत. वाचा- मुंबईचे ३ विजयासह ६ गुण आणि सरासरी प्लस ०७१ इतकी आहे. गुणतक्त्यात चेन्नई सुपर किंग्ज पहिल्या स्थानावर आहेत. चेन्नईची सरासरी प्लस १.४७५ इतकी असून दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या रॉयल चॅलेंजर्सपेक्षा (प्लस ०.०८९) त्यांची सरासरी ही किती तरी पट अधिक आहे. या दोन्ही संघांनी पाच विजयासह १० गुण मिळवले आहेत. पण सरासरीच्या बाबतीत चेन्नई फार पुढे आहे. वाचा- गुणतक्त्यात तिसऱ्या क्रमांकावर दिल्ली कॅपिटल्स, चौथ्या क्रमांकावर आहेत. कोलकाता पाचव्या, पंजाब किंग्ज सहाव्या तर सातव्या आणि सहा पैकी पाच पराभवासह हैदराबाद आठव्या स्थानावर आहे. वाचा- सर्वाधिक धाव करणारे फलंदाज फाफ डु प्लेसिस- २७० धावा शिखर धवन- २६५ धावा ग्लेम मॅक्सवेल- २२३ धावा सर्वाधिक विकेट घेणारे गोलंदाज हर्षल पटेल- १७ विकेट आवेश खान -१२ विकेट राहुल चहर- ११ विकेट
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3e00IKX
No comments:
Post a Comment