मुंबई : सध्याच्या करोनाच्या काळातही भारताच्या एका महत्वाच्या खेळाडूवर मोठी शस्त्रक्रीया करण्यात आली आहे. दुखापतीमुळे या खेळाडूला आयपीएलमधून बाहेर पडावे लागले होते. त्यानंतर आता त्याच्यावर ही शस्त्रक्रीया करण्यात आली आहे. आयपीएल खेळत असताना भारताचा यॉर्कर किंग अशी बिरुदावली मिरवणाऱ्या टी. नटराजनला दुखापत झाली होती. ही दुखापत गंभीर असल्यामुळे त्याला आयपीएल सोडावे लागले होते आणि हा सनरायझर्स हैदराबादच्या संघासाठी मोठी धक्का होता. पण त्यानंतर नटराजनच्या काही वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्या आणि त्याच्यावर शस्त्रक्रीया करण्याचा निर्णय घेण्यात आला. नटराजनवर आज शस्त्रक्रीया करण्यात आली आणि ती यशस्वीही ठरली आहे. या शस्त्रक्रीयेनंतर नटराजन म्हणाला, " या कठीण काळात माझ्यावर शस्त्रक्रीया करणाऱ्या सर्व मेडिकल स्टाफचे मी आभार मानू इच्छितो. त्याचबरोबर बीसीसीआनेही प्रत्येकवेळी मला चांगला पाठिंबा आणि प्रतिसाद दिला आहे, त्यामुळे त्यांचेही आभार मानतो. आता किती दिवसांमध्ये या सर्व गोष्टींमधून बाहेर पडतो, याकडे माझे लक्ष लागलेले असेल."
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2PvxR7U
No comments:
Post a Comment