मुंबई : आयपीएलच्या १४व्या हंगामात गतविजेते मुंबई इंडियन्सची कामगिरी अद्याप अपेक्षेप्रमाणे झालेली नाही. सलग दोन वेळा विजेतेपद मिळवणाऱ्या आणि या वर्षी जेतेपदाची हॅटट्रिक करण्यासाठी मैदानात उतरलेल्या मुंबई इंडियन्सने ५ पैकी फक्त २ लढतीत विजय मिळवला आहे. वाचा- मुंबई इंडियन्सने चार गुणांसह गुणतक्त्यात चौथ्या स्थान मिळवले आहे. पण या वर्ष मुंबईचा संघ लयीमध्ये दिसत नाही. मुंबई संघाने पहिल्या पाच लढती चेन्नईच्या चेपॉक मैदानावर खेळल्या आहेत. आता पुढील तीन लढती दिल्लीत खेळायच्या आहेत. मुंबई संघाच्या कामगिरीबद्दल बोलताना वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार आणि महान फलंदाज ब्रायन लाराने या संघाबद्दल काळजी वाटते असे म्हटले. वाचा- मला असे म्हणायचे आहे की, ही स्पर्धा खुप कठीण आहे. जे संघ रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू प्रमाणे जिंकत आहेत. ते आत्मविश्वासाने नव्या ठिकाणी जात आहेत. आत्मविश्वासाशिवाय जेव्हा तुम्ही नव्या ठिकाणी जाता तेव्हा त्या ठिकाणाला समस्या म्हणून पाहता. येथील खेळपट्टी अडचणीची वाटते, असे लारा म्हणाला. वाचा- मुंबई इंडियन्सची काळजी यासाठी वाटत आहे की ते आता नव्या ठिकाणी सामने खेळणार आहेत. मुंबईचे फलंदाज सातत्याने चांगली कामगिरी करत नाहीत. या वर्षी त्यांनी एकदाही १७०-१८० धावा केल्या नाहीत. हार्दिक पंड्या आणि क्रुणाल पंड्या यांना फॉर्म दिसला नाही. यामुळेच संघ टॉप २ मध्ये दिसत नाही. कायरन पोलार्डला धावा करता आल्या नाहीत. सूर्यकुमार यादव आणि इशान किशनच्या बॅटमधून धावा आल्या नाहीत. अशात दिल्लीच्या मैदानावर मुंबईचा संघ कशी कामगिरी करतोय हे पाहावे लागले. आयपीएलमध्ये उद्या गुरुवारी मुंबईची लढत राजस्थान रॉयल्सविरुद्ध होणार आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3e05gkE
No comments:
Post a Comment