मुंबई: आयपीएलच्या १४व्या हंगामात आज १६वी लढत आणि यांच्यात होणार आहे. दोन्ही संघाच्या नावार रॉयल्स हा शब्द आहे आणि ही लढत देखील चुरशीची होण्याची शक्यता आहे. या दोन्ही संघात आयपीएलमध्ये आतापर्यंत २३ लढती झाल्या आहेत. त्यापैकी दोघांनी प्रत्येकी १० लढती जिंकल्या तर तीन सामन्यांचा निकाल लागला नाही. गेल्या सहा सामन्यांचा विचार केल्यास, एकाचा निकाल लागला नव्हता. तर तीन लढती राजस्थानने जिंकल्या होत्या. आयपीएलच्या गेल्या हंगामातील दोन्ही लढती बेंगळुरूने जिंकल्या होत्या.विराटच्या नेतृत्वाखाली बेंगळुरूने या हंगामात एकही लढत गमावलेली नाही. आज विजयाचा चौकार मारण्याच्या उद्देशाने आरसीबी मैदानात उतरेल. वाचा- गुणतक्यात आरसीबी दुसऱ्या स्थानावर तर राजस्थान सातव्या स्थानावर आहे. त्यांनी ३ पैकी एकात विजय तर दोन मध्ये पराभव स्विकारला आहे. फलंदाजीचा विचार केल्यास आरसीबीकडे कर्णधार विराट कोहली, देवदत्त पडिक्कल ही सलामीची जोडी आहे. या दोघांना अजून मोठी धावसंख्या करता आली नाही. त्यानंतर ग्लेन मॅक्सवेल, एबी डिव्हिलियर्स सारखे स्फोटक फलंदाज आहेत. गोलंदाजीत हर्षल पटेल, मोहम्मद सिराज हे जलद तर शाहबाज अहमद, वॉशिंग्टन सुंदर आणि युजवेंद्र चहल हे फिरकीपटू आहेत. वाचा- राजस्थानचा पहिल्या लढतीत अखेरच्या चेंडूवर पराभव झाला होता. पण त्यानंतर त्यांनी दिल्लीविरुद्ध शानदार विजय साकारला. तर तिसऱ्या लढतीत चेन्नईकडून त्यांचा पराभव झाला. राजस्थानची फलंदाजी पाहिल्यास जोस बटलर, मनन व्होरा, संजू सॅमसन, शिवम दुबे, डेव्हिड मिलर, रेयान पगार ही फळी आहे. गोलंदाजीत जयदेव उनाडकट आणि चेतन सकारिया यांनी आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. त्याच बरोबर ख्रिस मॉरिस हे मोठे नाव संघात आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2Pc404d
No comments:
Post a Comment