मुंबई: आयपीएलच्या गेल्या म्हणजेच १३व्या हंगामात पहिल्या चार मध्ये येण्यासाठी ()ला वाट पाहावी लागली होती. गेल्या हंगामात सातव्या स्थानावर राहिलेल्या सीएसकेने या वर्षी पहिल्या लढतीत पराभव स्विकारला. पण त्यानंतर सलग तीन लढतीत विजय मिळून गुणतक्यात अव्वल स्थान मिळवले. वाचा- वानखेडे मैदानावर झालेल्या सामन्यात चेन्नईने कोलकाता नाइट रायडर्स( )चा १८ धावांनी पराभव केला आणि सलग तिसऱ्या विजयाची नोंद केली. या विजयासह चेन्नईने सहा गुण आणि प्लस १.१४२ रन रेटसह अव्वल स्थान मिळवले. चेन्नई नेहमीच गुणतक्यात पहिल्या चार मध्ये असणार संघ आहे. पण गेल्यावर्षी मात्र चित्र वेगळे होते. गुणतक्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू दुसऱ्या स्थानावर आहे. दिल्ली कॅपिटल्स तिसऱ्या तर गत विजेते मुंबई इंडियन्स चौथ्या स्थानावर आहेत. या हंगामात आरसीबी आणि राजस्थान वगळता अन्य सर्व संघांनी चार सामने खेळले आहेत. आज आरसीबी आणि राजस्थान यांच्यात लढत होणार आहे. ही लढत जिंकल्यास आरसीबीला अव्वल स्थान मिळू शकते. नेट रनरेटचा विचार केल्यास चेन्नई सुपर किंग्ज इतके चांगले रनरेट अन्य कोणत्याही संघाचे नाही. याचा फायदा त्यांना प्ले ऑफच्या क्रमांकासाठी होऊ शकतो. स्पर्धेत आतापर्यंत सर्वाधिक धावा करणारे फलंदाज १) शिखर धवन- २३१ २) ग्लेन मॅक्सवेल- १७६ ३) जॉनी बेयरस्टो- १७३ सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत आरसीबीचा हर्षल पटेल पहिल्या स्थानावर आहे. त्याने ३ सामन्यात ९ विकेट घेतल्या आहेत. १) हर्षल पटेल-९ विकेट २) दीपक चहर- ८ विकेट ३) आवेश खान- ८ विकेट
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3dFRkfq
No comments:
Post a Comment