चेन्नई : आयपीएलच्या १४व्या हंगामात विरुद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्सने प्रथम फलंदाजी करत २० षटकात ६ बाद १३१ धावा केल्या. मुंबईकडून कर्णधार रोहित शर्माने सर्वाधिक ६३ धावा केल्या. तर पंजाबकडून रवी बिश्नोई आणि मोहम्मद शमी यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. वाचा- पंजाबचा कर्णधार केएल राहुलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दीपक हुड्डाने दुसऱ्या ओव्हरच्या अखेरच्या चेंडूवर क्विंटन डी कॉकला ३ धावांवर माघारी पाठवले आणि मुंबईला पहिला धक्का दिला. त्यानंतर इशान किशन ६ धावांवर बाद झाला. त्याला रवी बिश्नोईने बाद केले. पहिल्या १० षटकात मुंबईला फक्त ४८ धावा करता आल्या. वाचा- वाचा- धावसंख्या कमी असली तरी आणि सूर्यकुमार यादव यांनी तिसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागिदारी केली. या जोडीने संघाला १००च्या पुढे नेले. ही जोडी पुन्हा एकदा रवी बिश्नोईने फोडली. त्याने सूर्यकुमारला ३३ धावांवर बाद केले. त्यानंतर अर्धशतक करणारा रोहित शर्मा ६३ धावांवर माघारी परतला. त्याने ५२ चेंडूत ५ चौकार आणि २ षटकार मारले. वाचा- ... मधळ्या फळीतील हार्दिक पंड्या पुन्हा एकदा धावा करण्यात अपयशी ठरला. तो ४ चेंडूत एक धाव करून बाद झाला. अखेरच्या चार षटकात मुंबईला फक्त २६ धावा करता आल्या.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3tNHTjt
No comments:
Post a Comment