नवी दिल्ली : केकेआरविरुद्धचा सामना सुरु होण्यापूर्वीच दिल्ली कॅपिटल्सच्या संघाला एक मोठा धक्का बसला आहे. कारण एक महत्वाचा खेळाडू आज संघाबाहेर गेला आहे. त्यामुळे आता दिल्लीची कामगिरी कशी होते, याकडे सर्वांचे लक्ष असेल. अमित मिश्राने आतापर्यंत दिल्ली कॅपिटल्सकडून खेळताना अचूक आणि भेदक गोलंदाजी केली होती. त्याचबरोबर अमितने आतापर्यंत विकेट्सही मिळवल्या होत्या. पण मिश्राला या सामन्यापूर्वीच दुखापत झाली असून तो आजच्या सामन्यात खेळणार नाही. मिश्राच्या जागी संघात ललित यादवला संधी देण्यात आली आहे. त्यामुळे मिश्रा न खेळणे हे दिल्लीला मोठा झटका आहे. पण मिश्राच्या अनुपस्थितीत दिल्लीची फिरकी गोलंदाजी कशी होते, याकडे सर्वांचेच लक्ष असेल. आजच्या सामन्यात दिल्लीच्या संघात एकच महत्वाचा बदल करण्यात आला आहे. अजिंक्यच्या जागी संघात आलेला स्टीव्हन स्मिथकडूनही चांगली फलंदाजी पाहायला मिळालेली नाही. त्याच्याजागी आजच्या सामन्यात अजिंक्यला किंवा सॅम बिलिंग्सला संधी मिळू शकते, अशी जोरदार चर्चा होती. पण यावेळी दिल्लीने पुन्हा एकदा स्मिथवर विश्वास ठेवल्याचे पाहायला मिळाले आहे. केकेआर आणि दिल्ली कॅपिटल्स या संघांमध्ये आजचा दुसरा सामना रंगणार आहे. या सामन्यात कोणता संघ बाजी मारतो, याकडे सर्वांचेच लक्ष असेल. कोलकाता नाइट रायडर्सपुढे आजच्या सामन्यात मोठे आव्हान असेल ते दिल्ली कॅपिटल्सचे. सध्याच्या घडीला दिल्लीचा संघ हा गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे, तर केकेआरचा संघ हा पाचव्या स्थानावर आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात कोण कोणाला धक्का देतो, हे पाहणे उत्सुकतेचे असेल.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3t5pjSR
No comments:
Post a Comment