हरारे: झिम्बाब्वे आणि पाकिस्तान यांच्यात टी-२० मालिका सुरू आहे. या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात झिम्बाब्बेने २० षटकात ९ बाद ११८ धावा केल्या. त्यानंतर गोलंदाजांना शानदार कामगिरी करत पाकिस्तानचा २० षटकात ऑल आउट करत मॅच १९ धावांनी जिंकली. वाचा- पहिल्या टी-२० सामन्यात पाकिस्तानने विजय मिळवाल होता. आता तीन सामन्यांची मालिका १-१ अशी बरोबरीत झाली आहे. दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. झिम्बाब्बेकडून कामुनुखुमवेने सर्वाधिक ३४ धावा केल्या आणि संघाला ११८ पर्यंत पोहोचवले. वाचा- विजयासाठी सोपे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या पाकिस्तानकडून बाबर आझमने ४१ धावा केल्या. त्याला याने बाद केले. ल्युकने या सामन्यात १८ धावा देत ४ विकेट घेतल्या. त्याने बाबरची महत्त्वाची विकेट घेतली. त्यानंतर ज्या पद्धतीने ल्युकने जल्लोष केला त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. वाचा- बाबरची विकेट घेतल्यानंतर ल्युकने बुट काढला आणि कानावर लावत फोन लावल्या प्रमाणे अॅक्शन केली. त्याच्या या जल्लोषाचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. वाचा- विक्रम अशाच प्रकारचा जल्लोष दक्षिण आफ्रिकेचा जलद गोलंदाज तबरेज शम्सी देखील करतो.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3gzLDBt
No comments:
Post a Comment