नवी दिल्ली : सध्याच्या घडीला दिल्ली कॅपिटल्सच्या संघात अजिंक्य रहाणेला संधी मिळणार का, याची उत्सुकता चाहत्यांना आहे. कारण अजिंक्यच्या जागी संघात आलेला स्टीव्हन स्मिथकडूनही चांगली फलंदाजी पाहायला मिळालेली नाही. त्यामुळे पुन्हा एकदा अजिंक्यला दिल्लीच्या संघात स्थान मिळणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल. दिल्लीकडे काय पर्याय आहेत, पाहा...जर स्टीव्हन स्मिथला विश्रांती द्यायची असेल तर दिल्लीच्या संघाकडे अजिंक्यचा चांगला पर्याय आहे. यापूर्वीही अजिंक्यला संधी देण्यात आली होती, त्यामुळे धावा करण्यात तो अपयशी ठरला होता. त्यामुळे अजिंक्यला आता पुन्हा एकदा दिल्लीच्या संघात संधी मिळू शकते. स्मिथ हा एक परदेशी खेळाडू आणि त्याच्याजागी एक विदेशी खेळाडू खेळवण्याचा विचार दिल्लीचा संघ करून शकतो. सध्याच्या घडीला सॅम बिलिंग्स हे नाव पुढे येत आहे. आतापर्यंत सॅमने धडाकेबाज फलंदाजी केलेली आहे. त्यामुळे दिल्लीसाठी तिसऱ्या क्रमांकावर येऊन तो मोठे फटकेबाजी करू शकतो. त्यामुळे आजच्या सामन्यात अजिंक्यला संधी मिळणार की सॅमला, याची उत्सुकता चाहत्यांना नक्कीच असेल. यापूर्वी अजिंक्यला संधी देण्यात आली होती आणि त्यामध्ये तो अपयशी ठरला होता. त्यामुळे आता एका नव्या खेळाडूला संधी दिल्लीचा संघ देऊ शकतो. अनुभवाच्या जोरावर अजिंक्यला ही संधी मिळायला हवी. पण नवा खेळाडू जर खेळवायचा असेल तर दिल्लीचा संघ यावेळी सॅमला पसंती देऊ शकतो, असे म्हटले जात आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात दिल्लीच्या संघात नेमका कोणता बदल होतो, याकडे सर्वांचेच लक्ष असेल. कोलकाता नाइट रायडर्सपुढे आजच्या सामन्यात मोठे आव्हान असेल ते दिल्ली कॅपिटल्सचे. सध्याच्या घडीला दिल्लीचा संघ हा गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे, तर केकेआरचा संघ हा पाचव्या स्थानावर आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात कोण कोणाला धक्का देतो, हे पाहणे उत्सुकतेचे असेल. केकेआर आणि दिल्ली कॅपिटल्स या संघांमध्ये आजचा दुसरा सामना रंगणार आहे. या सामन्यात कोणता संघ बाजी मारतो, याकडे सर्वांचेच लक्ष असेल.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3nBgwXB
No comments:
Post a Comment