अहमदाबाद : आयपीएलच्या १४व्या हंगामात सोमवारी झालेल्या सामन्यात कोलकाता नाइट रायडर्सने पंजाब किंग्जचा पराभव केला. या सामन्यात अशी एक घटना घडली ज्यामुळे भारताचा माजी क्रिकेटपटू विरेंद्र सेहवाग भडकला. वाचा- पंजाब किंग्जने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ९ बाद १२३ धावा केल्या. केकेआरने कर्णधार इयान मॉर्गनच्या नाबाद ४७ धावांच्या जोरावर विजय मिळवला. या सामन्यात कोलकाताचा संघ गोलंदाजी करत असताना डग आउटमधून कोर्ड वर्ड मेसेज पाठवण्यात आला. यावर सेहवाग चांगलाच भडकला. अशा पद्धतीने जर डग आउटमधून खेळण्याची परवानगी दिली तर कोणालाही कर्णधार करता येईल. वाचा- कोलकाता नाइट रायडर्सचे नाथन लीमन यांनी सामना सुरू असताना एका कागदावर मॉर्गनसाठी संदेश पाठवला. या कागदावर ५४ असे लिहले होते. समालोचक आणि टीव्हीवर सामना पाहणाऱ्या चाहते याचा अर्थ आपआपल्या परीने काढत होते. पण प्रत्यक्षात त्याचा काय अर्थ हे फक्त मार्गन आणि लीमन यांनाच माहिती. वाचा- क्रिकबझ सोबत बोलताना सेहवाग म्हणाला, बॅकरूम स्टाफची मदत घेण्यात काही गैर नाही. पण यामुळे कर्णधाराला कमी समजते असा अर्थ निघतो. आपल्याकडे कोड भाषा फक्त लष्करात वापरली जाते. ५४ चा अर्थ एखाद्या खास वेळी विशिष्ट गोलंदाजाकडून ओव्हर टाकून घ्यायची असा असू शकतो. मला वाटते की संघ व्यवस्थापन आणि कोच हे कर्णधाराला डग आउट मधून थोडी मदत करत असावेत. तुम्ही जर मैदानाच्या बाहेरून अशा प्रकारची मदत देत असाल तर कोणालाही कर्णधार करता येईल. अशा परिस्थितीत मॉर्गनच्या हुशारीला काही अर्थ राहत नाही. कारण त्याच्या जोरावर इंग्लंडने वर्ल्डकप जिंकला होता. वाचा- कर्णधाराला मैदानाबाहेर नक्कीच मदत मिळाली पाहिजे. पण कर्णधाराचे स्वत:चे देखील काही असते. कोणत्या वेळी गोलंदाजाचा वापर करून घ्यायचा. अनेक वेळा २५वा खेळाडू देखील चांगला सल्ला देऊ शकतो, असे सेहवाग म्हणाला.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3aInkO0
No comments:
Post a Comment