चेन्नई : ऋतुराज गायकवाड आणि फॅफ ड्यु प्लेसिस या दोन्ही सलामीवीरांनी केकेआरच्या गोलंदाजांना आपल्यापुढे लोटांगण घालायला भाग पाडले. त्यामुळेच ऋतुराज आणि फॅफ यांच्या धडाकेबाज फटकेबाजीच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्सला आजच्या सामन्यात २२० अशी मोठी धावसंख्या उभारता आली. फॅफने यावेळी नाबाद ९५ धावांची तुफानी खेळी साकारली. केकेआरने नाणेफेक जिंकून यावेळी चेन्नईला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. चेन्नईच्या ऋतुराज आणि फॅफ यांनी सुरुवातीपासूनच केकेआरच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. यावेळी फॅफपेक्षा ऋतुराज जासत आक्रमकपणे फलंदाजी करत असल्याचे पाहायला मिळाले. ऋतुराजने यावेळी ३३ चेंडूंत आपले अर्धशतक साजरे केले. ऋतुराजचे या हंगामातील हे पहिलेच अर्धशतक ठरले. ऋतुराजने यावेळी ४२ चेंडूंत सहा चौकार आणि चार षटकारांच्या जोरावर ६४ धावांची धडेकाबाज खेळी साकारली. ऋतुराज आणि फॅफ यांनी यावेळी ११५ धावांची सलामी दिली. ऋतुराज बाद झाल्यावर फॅफने जोरदार फटकेबाजी केली, त्याला यावेळी मोइन अलीची चांगली साथ मिळाली. फॅफने यावेळी ३५ चेंडूंमध्ये आपले अर्धशतक साजरे केले. मोइन अलीने यावेळी २१ चेंडूंत २१ धावा केल्या. यावेळी फॅफ आणि मोइन अली यांच्यामध्ये दुसऱ्या विकेटसाठी ४६ धावांची भागीदारी पाहायला मिळाली. मोइन अली बाद झाल्यावर चेन्नईच्या संघाने यावेळी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला चौथ्या स्थानावर बढती दिली. धोनीने या संधीचा चांगलाच फायदा यावेळी उठवल्याचे पाहायला मिळाले. कारण धोनी सुरुवातीपासूनच आक्रमक फलंदाजी करत असल्याचे यावेळी पाहायला मिळाले. धोनीने यावेळी फक्त ८ चेंडूंत दोन चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर १७ धावा केल्या. फॅफनेही अखेरच्या षटकांमध्ये आक्रमक फलंदाजी केली. सध्याच्या घडीला चेन्नईचा संघ हा गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे. चेन्नईच्या संघाने आतापर्यंत तीन सामने खेळले आहेत. त्याचबरोबर या तीन सामन्यांमध्ये त्यांना दोन विजय मिळवता आले आहेत आणि एका सामन्यात त्यांचा पराभव झाला आहे. त्यामुळे आजचा सामना जर चेन्नईच्या संघाने जिंकला तर त्यांचे सहा गुण होतील आणि नेट रनरेट चांगला असल्यामुळे त्यांना अव्वल स्थानावर पोहोचता येऊ शकते. त्यामुळे आजच्या सामन्यात नेमकं काय होतं, याची उत्सुकता सर्वांना असेल.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3awFm5A
No comments:
Post a Comment