अहमदाबाद : दिल्ली कॅपिटल्सचा अनुभवी फिरकीपटू अमित मिश्राकडून यावेळी आरसीबीविरुद्धच्या सामन्यात मोठी चुक घडल्याचे पाहायला मिळाले. पहिला चेंडू टाकण्यापूर्वीच मिश्राकडून ही चुक घडली आणि पंचांनी यावेळी त्याच्यावर मैदानातच कारवाई केली. दिल्लीसाठी सातवे आणि आपले वैयक्तिक पहिले षटक घेऊन मिश्रा येत होता. मिश्रापुढे यापुढे ग्लेन मॅक्सवेलचे मोठे आव्हान होते, कारण तो धडाकेबाज फटकेबाजी करत होता. पण पहिला चेंडू टाकण्यापूर्वीच मिश्राकडून एक मोठी चुक घडली आणि पंचांनी यावेळी त्याच्यावर लगेच कारवाईही केली. पहिला चेंडू टाकण्यापूर्वी मिश्राच्या हातामध्ये चेंडू होता. यावेळी मिश्राने चेंडूला थुंकी लागली आणि चेंडूला चकाकी देण्याचा प्रयत्न केला. पण पंचांच्या लक्षात ही गोष्ट आली. त्यावेळी पंचांनी मिश्राच्या हातातून चेंडू काढून घेतला. त्यानंतर त्यांनी हा चेंडू आपल्याकडे असलेल्या रुमालाने पुसला. त्यानंतर पंचांनी मिश्राला ताकिद दिली. कारण आयपीएलच्या नव्या नियमांनुसार मिश्राने केलेली गोष्ट ही अयोग्य होती. त्यामुळेच पहिला चेंडू टाकण्यापूर्वीच मिश्राची सुरुवात मात्र चांगली झाली नाही. पण मिश्राने यावेळी या गोष्टीचे जास्त दडपण घेतले नाही. कारण त्याने ग्लेन मॅक्सवेलला स्टीव्हन स्मिथकरवी झेलबाद करत संघाला मोठे यश मिळवून दिले. आयपीएलचा नवीन नियम काय सांगतो...करोनामुळे आयपीएलच्या नियमांमध्ये .काही बदल करण्यात आला आहे. या नव्या नियमांनुसार कोणताही खेळाडू चेंडूला लाळ किंवा थुंकी लावू शकत नाही. जर कोणत्याही खेळाडूने ही गोष्ट केली तर त्याच्यावर कारवाई करण्यात येऊ शकते. मिश्राकडून पहिल्यांदाच ही चुक घडली आहे, त्यामुळे त्याला यावेळी फक्त ताकिद देण्यात आली आहे. पण यापुढे जर मिश्राकडून अशीच गोष्ट घडली तर त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येऊ शकते. त्यामुळे यापुढे मिश्राला नक्कीच सावध राहावे लागणार आहे. आजच्या सामन्यात जो संघ जिंकेल त्यांना गुणतालिकेत अव्वल स्थानावर जाण्याची संधी असेल. त्यामुळे आजच्या सामन्यात कोणता संघ जिंकतो, याची उत्सुकता सर्वांनाच असेल.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3dVLTJ8
No comments:
Post a Comment